मौजे वाखरी येथील जमीन खरेदी करताना सक्षम प्रांताधिकार्यांची परवानगी घेतलेली नसून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा शिवसंग्राम संघटना व शिवराज्य पक्ष आंदोलन करणार
पंढरपूर लाईव्ह
(प्रतिनिधी)- पंढरपूर तालुक्यातील पालखी मार्गावर असलेल्या मौजे वाखरी येथील जमीन गट नं.26/3 क्षेत्र 1 हे-62 आर, ग.नं.26/4ब क्षेत्र 1 हे-61 आर, गट नं.28/3 क्षेत्र 1हे-88 आर, गट नं.27/2अ/2 क्षेत्र 8 हे-86 आर, गट नं.27/2/ब/1 क्षेत्र 0 हे-81 आर, गट नं.822 क्षेत्र 3 हे-22 आर या जमिनीचे खरेदीपूर्वी महाराष्ट्र अॅकॅडमी ऑङ्ग इंजिनिअरींग अॅन्ड एज्युकेशन सोसायटी रिसर्च पुणे तर्ङ्गे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांच्या संस्थेने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधि.1948 चे कलम 63 अन्वये जमीन खरेदी करताना सक्षम प्रातांधिकार्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना त्याबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे या संस्थेवर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसंग्राम सामाजिक संघटनेचे वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा पंढरपूर तालुकाध्यक्ष गणेश गोडसे व शिवराज्य पक्षाच्यावतीने अंकुश गायकवाड यांनी दिला आहे.
पंढरपूर तहसिल कार्यालयास उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांनी पाच महिन्यापूर्वी आदेश देवूनदेखील सदर
जमिनीवरील व पत्रातील सर्व गट क्षेत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सदर संस्थेचे चालकांना
राजकीय पाठबळ मिळत असल्याने नियमाचे उल्लंघन करणार्या सदर संस्थेवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. सदर प्रकरणाचे निवेदन विभागीय आयुक्त यांना दि.29 रोजी शासकीय विश्रामगृह येथे देण्यात आलेले आहे.
वास्तविक पाहता पालखी मार्गावर असणार्या प्रत्येक शेतकर्याच्या शेतजमिनीवर आषाढी यात्रेच्यावेळी
वारकर्यांना उतरण्यासाठी आपली शेतजमीन खुली करून देण्यात यावी असा राज्य शासनाचा जीआर असताना देखील सदर शैक्षणिक संस्थेच्यावतीने वारकर्यांना उतरण्यासाठी कोणत्याही प्रकारे जागा उपलब्ध केली जात नाही. त्या शैक्षणिक संकुलाच्या आतमध्ये देखील प्रवेश दिला जात नसल्याचे वारकर्यांचे म्हणणे आहे. यामुळे पालखी मार्गावरील शेतकर्यांना एक न्याय आणि संस्था प्रमुखांना एक न्याय असा प्रकार सुरू असल्याचे दिसत येथून पुढे निवेदन न देता आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष गणेश गोडसे यांनी दिला.
*************