श्री. विठ्ठल एज्युकेषन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट ही संस्था ग्रामिण भागासाठी विषेष पर्वणी -कुलगुरु डॉ.ए.के.दास

ओरिसा राज्याच्या षिष्ठमंडळाने दिली स्वेरीला भेट

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर -‘ग्रामिण भागात संषोधनातून आवष्यक त्या समस्यांवर मात करणे आता षक्य झाले आहे. या समस्यांच्या निराकरणामध्येच ग्रामिण भागांचा विकास दडलेला आहे.‘स्वेरी’ ही ग्रामिण भागातील षेतकरी व नागरिकांसाठी विषेष पर्वणीच ठरत आहे.’ असे प्रतिपादन ओरिसा राज्यातील उत्कल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ए.के.दास यांनी केले.

        येथील श्री विठ्ठल एज्युकेषन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट तथा स्वेरीच्या एन.के एन. (नॅषनल नॉलेज नेटवर्क)व आर.एच.आर.डी. एफ.या प्रकल्पांना ओरिसा राज्याच्या षिष्ठमंडळाने काल भेट दिली. प्रारंभी संषोधन विभाग प्रमुख डॉ. प्रषांत पवार यांनी संंस्थेची सपुर्ण माहिती सांगितली संस्थेचे संस्थापक सचिव व

प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी ओरिसा षिष्ठमंडळाचे स्वागत करुन प्रस्ताविक केले. माळरानापासून ते राष्ट्रीय आंतराष्ट्रीय पातळीपर्यंतचा एक उत्तम तंत्रज्ञान ते षिक्षण संस्थेचा हा प्रवास विषद केला. समाज्याच्या षेवटच्या घटकापर्यंत तंत्रज्ञानाच्या सुविधा आणि तंत्रषिक्षण याचा सुयोग्य वापर कषा पध्दतीने झाला पाहिजे यासाठी ही बैठक आयोजिल्याचे प्राचार्य डॉ. रोंगे यांनी सांगितले. या प्रसंगी आलेले षिष्ठमंडळ हे संस्थेची ग्रामिण भागातील नागरिकांसाठी व षेतकर्‍यांसाठी सुरु असलेले विविध प्रयोग व चालू असलेल्या संषोधनावर माहिती जाणून घेत होते. या प्रकल्पाला पाहून, जाणून, षिष्ठमंडळ समाधानी झाले. पुढे बोलताना कुलगुरु डॉ. दास म्हणाले,‘आपल्याकडे उपलब्ध असणार्‍या मानव व संसाधनाचा वापर अजूबाजूच्या जनतेच्या विकासाठी कसा केला जावू षकतो, याचे उत्तम उदाहरण या महाविद्यालयाने स्थापन केले आहे. सध्याच्या प्रगत युगात प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी काम करत असताना आपल्या आसपासच्या जनतेसाठी तत्रंज्ञान तयार करण्यासाठी महाविद्यालयाने भाभा अनुषक्ती केंद्र मुबंई यांच्या सहाय्याने एक वेगळी यंत्रणा उपलब्ध केली आहे. यामध्ये असणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर ओरिसातील जनतेच्या विविध समस्या सोडविण्यात उपयोगी पडतील.यामध्येही ओरिसामध्येही ही पिण्याच्या पाण्याची समस्या, योग्य बियाणे न मिळणे, मासे वाळविण्यासाठी लागणार्‍या सौर उर्जेचा वापर, माती परिक्षण, इत्यादी बाबींचे अनुकरण ओरिसातील षिक्षण संस्था आपले महाविद्यालय व भाभा अनुषक्ती केंद्र मुबंई इत्यादींच्या सहकार्याने करु षकतील.’ षिष्ठमंडळामधील उच्च षिक्षण विभागाचे उपसचिव डॉ. अजय नायक यांनी,‘अषा प्रकल्पांची सुरवात प्रथमता आम्ही एन.एस.एस.च्या माध्यामातून पाण्याचा प्रष्न सोडविण्यापासून करु.’ असे प्रतिपादन केले. ओरिसा नॉलेज कार्पोरेषन लिमी.चे डॉ. मनोरंजन पुथाल यांनी, ‘षिक्षण पंढरी प्रकल्पांची प्रषंसा करुन अषा प्रकारचा प्रकल्प ओरिसामध्येही षिक्षणासाठी क्रांतीपूर्व ठरू षकतो. हे दोन्ही प्रकल्प विषेषता ओरिसातील आदीवासी लोकांचे जीवन बदलण्यास महत्वपुर्ण ठरतील. या प्रकल्पातून महाविद्यालयाने केलेले ग्रामीण रोजगार निर्मितीचे तांत्रिक प्रयत्न ओरिसात ही उपयोगी पडतील.’ असे प्रतिपादन सर्व मान्यवरांनी केले. पुढे ग्रामीण भागात या प्रकल्पांचा परिणाम जाणून घेण्यासाठी षिष्ठमंडळाने तिसंगी येथील आकृती केंद्राला भेट दिली. या भेटी दरम्यान माजी सरपंच व पांडुरंग कारखान्याचे संचालक तानाजी वाघमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. गावातीलच वामन षेळके यांच्या प्रकल्पाअंतर्गत लागवड केलेल्या भुईमुग बियांच्या रोपांची पाहणी, तसेच गावातील बचत गटाकडून सौर वाळवण यंत्राचा गटास कसा फायदा होत आहे हे जाणून घेतले. पुढे गावकर्‍यांकडून व अंगणवाडी शिक्षकेकडून वाटर फिल्टरमुळे आरोग्यावर झालेल्या परिणामाचीही माहिती घेतली. गावकर्‍यांनीही या फिल्टरमुळे पाण्याच्या चवीत झालेल्या बदलाबद्दल व आरोग्य सुधारणे बाबत षिष्ठमंडळास उत्साहाने माहिती दिली. यावेळी उत्कल विद्यापीठाचे रजिस्टार डॉ.सुषांत दास, डॉ. सतिष प्रधान डॉ. भागबन किसान, बी.ए.आर.सी.चे डॉ. अमर बॅनर्जी व डॉ. स्मिता मुळे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल उपाध्यक्ष एन.एस.कागदे, विष्वस्त एन.एम.पाटील, डॉ. कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ.एस.एम.मुकणे, आदी संषोधक उपस्थित होते.

छायाचित्र:-ओरिसा येथील षिष्ठमंडळाने नुकतेच स्वेरीला भेट देवून विविध संषोधन प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.याप्रसंगी ओरिसा राज्यातील उत्कल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ए.के.दास यांच्या समवेत त्यांचे षिष्ठमंडळ उत्कल विद्यापीठाचे रजिस्टार डॉ. दास, डॉ. प्रधान, उपसचिव डॉ. नायक,डॉ. किसान, डॉ. पुथाल, बी.ए.आर.सी.चे डॉ. बॅनर्जी व डॉ. स्मिता मुळे, संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल,उपाध्यक्ष एन.एस.कागदे, विष्वस्त एन.एम.पाटील, डॉ. कुलकर्णी, प्राचार्य प्रा.एन.डी.मिसाळ, डॉ. प्रषांत पवार, अधिष्ठाता डॉ.एस.एम.मुकणे व आदी संषोधक.
*****************************

   



 


**************************************************

 


पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

आज दि.  रोजी आज दि. 14-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 98 हजार 488 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  14-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 003 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399