धरणग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलनाला 38 दिवसानंतर यशस्वी
पंढरपूर लाईव्ह (श्रीराम आरकिले यांजकडून)
दि.13 मे 2015
श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सोलापूर सह सहा जिल्ह्यात गेले 38 दिवसापासून सुरु
असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या अनुषंगाने महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री ना.एकनाथ खडसे यांचेसह विविध खात्याचे सचिव, डॉ. भारत पाटणकर, जिल्हाधिकारी डॉ. तुकाराम मुंढे यांचेसह आंदोलक प्रतिनिधी यांचेसह झालेल्या बैठकीमध्ये महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख मोहन अनपट यांनी आंदोलनस्थळी दिली.
हसु आणि आसु...
तब्बल 38 दिवसाच्या खडतर आंदोलनानंतर आज धरणग्रस्तांच्या चेहर्यावर हसु फुललेले दिसले. मात्र या आंदोलनादरम्यान काही काळ आंदोलनकर्त्यांना वादळी वार्यामुळे वेळेत घरुन शिदोरी न मिळाल्यामुळे उपाशीपोटी सुध्दा झोपावे लागले.. हा अनुभव कथन करणारे आणि ऐकणारे धरणग्रस्त सर्वांचेच डोळे पाणावलेले होते... यावेळी धरणग्रस्तांनी विविध स्फुर्तीगीते गाऊन तहसिल कार्यालयाच्या वातावरणात एक वेगळीच वातावरण निर्मिती केल्याची अनुभूती आली.
हे आंदोलन करताना सर्व धरणग्रस्तांनी एकजुटीने अखेरपर्यंत आपला निश्चय ठाम ठेवल्यामुळे च हे यश मिळाल्याचे समाधान सर्वांच्या चेहर्यावर दिसत होते.
मागण्या मान्य झाल्याने गेले 38 दिवस ऊन्हा-तान्हात, पावसात कशाची ही तमा न बाळगता बेमुदत ठिय्या आंदोलन करणार्या धरणग्रस्तांनी आज आनंद साजरा केला. मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये ज्या धरणग्रस्तांना नोकर्या नाहित अशा पात्र उमेदवारांना एकेक्कमी 5 लाख रु. व घर बांधणि अनुदान 1 लाख 65 हजार रु. या केंद्राच्या नविन कायद्याची अंमलबजावणी येत्या पावसाळी अधिवेशनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला पुनर्वसन अधि. श्रीपती मोरे, अधि.अभि. ब.दा. तोंडे, कार्य.अभि.बिराजदार, उप अभि.जिवणे आदी उपस्थित होते.
या निर्णयानंतर धरणग्रस्तांनी आज आपले पंढरपूरमधील तहसिल कार्यालयासमोरील आंदोलन आज थांबवले. यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत वरील माहिती देण्यात आली.
या बैठकीला पुनर्वसन अधि. श्रीपती मोरे, अधि.अभि. ब.दा. तोंडे, कार्य.अभि.बिराजदार, उप अभि.जिवणे आदी उपस्थित होते.
या निर्णयानंतर धरणग्रस्तांनी आज आपले पंढरपूरमधील तहसिल कार्यालयासमोरील आंदोलन आज थांबवले. यानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत वरील माहिती देण्यात आली.