पंढरपूर लाईव्ह
15 मे :
महागाईने होरपळणार्या सर्वसामान्य जनतेचा आता आणखी महागाईचे चटके बसणार आहे. पेट्रोलच्या दरात 3.13 तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांनी वाढ करण्यात आलीये. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. 15 दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती आता पुन्हा एकदा दरवाढीचा पेट्रोलबॉम्ब पडलाय.
काही महिन्यांपूर्वी आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किंमतीत कपात होत होती. त्यामुळे याचे परिणाम भारतातही जाणवले.भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमालीची कपात करण्यात आली होती. मात्र, आता ही कपात भरून काढली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पेट्रोलच्या दरात 3 रुपये 18 पैशांने वाढ करण्यात आली होती. तर डिझेलच्या दरातही 3 रुपये 9 महागले होते. एप्रिलमहिन्याच्या सुरुवातील पेट्रोल 49 तर डिझेल 1 रुपयांने स्वस्त करून जनतेला दिलासा देण्यात आला. पण, हा दिलासा महिन्याच्या अखेरीस हिरावून घेण्यात आला. मागील महिन्यात 30 एप्रिल रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये 96 तर डिझेलच्या दरात 2 रुपये 37 पैशांने महागलं होतं. ही दरवाढ सोसून 15 दिवस उलटत नाही तेच पुन्हा एकदा दरवाढीनं डोकंवर काढलंय.पेट्रोल 3.13 तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांनी वाढ करण्यात आलीये. गेल्या दोन महिन्यात करण्यात आलेली कपात या दरवाढीतून भरून काढली जात असल्याचं दिसून येतंय.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर
- मुंबई पेट्रोल 73.78 रूपये
- मुंबई डिझेल 59.34 रूपये
- नागपूर पेट्रोल 76 रूपये
- नागपूर डिझेल 59 रूपये