विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
पंढरपूर लाईव्ह:-
भारतीय घटनेचे शिल्पकार,विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंती निमित्ताने येथील शिवतिर्थावर विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.भारत भालके हे होेते.या कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव,न.पा.चे मुख्याधिकारी शंकर गोरे,प्रतिष्ठाणचे संस्थापक डि.राज सर्वगोड,दिलीप कोरके आदी उपस्थित होते.
आपण समाजाचे काही देणे लागतो.आपल्या सभोवतालच्या
प्रत्येकाला आपल्या हातुन काहीतरी मदत,मार्गदर्शन झाले पाहीजे आणि त्याच
बरोबर समाजाचे वैचारीक प्रबोधन झाले पाहीजे या भावनेने डॉ.बाबासाहेब
आंबेडकर प्रतिष्ठाणची वाटचाल सुरु असुन आपल्या कार्याने एक वेगळी ओळख या
प्रतिष्ठाणने निर्माण केली आहे असे प्रतिपादन या प्रसंगी बोलताना सहकार
शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.
यावेळी पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचलीत गौतम विद्यालयातील विद्यार्थीनींना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास किरण घाडगे,नगरसेवक शकुर बागवान,राजाभाऊ भोसले,नामदेव भुईटे,दिपक चंदनशिवे,आशाताई बागल,महादेव भालेराव,महादेव देठे,रामचंद्र ननवरे,भारत माळी,गुरु दोडीया,आनंद सोमासे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सुदाम गायकवाड यांनी केले.सुत्रसंचालन विलास जगधने सर यांनी केले.शेवटी आभार अनिल ननवरे यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीवविजय वाघ,परमेश्वर गोडसे,दिपक नाईकनवरे,बाबासाहेब चंदनशिवे,दि.बा.शेळके,लखन ठावरे,उमेश सासवडकर,मोहन शिंदे,किरण ठावरे,प्रभाकर गायकवाड,रमेश सासवडकर,भैय्या सर्वगोड,सुधिर घोडके,सुहास जाधव,गुणंद आखाडे,अनिल सरवदे,प्रशांत आठवले,महेश साठे,किशोर खिलारे,मुकेश लकेरी,राहुल गावडे,महेश मोटे,अनिल सरवदे यांच्यासह प्रतिष्ठाणच्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ:- डॉ.आंबेडकर प्रतिष्ठाणच्या वतीने शालेय गणवेश वाटप करताना कल्याणराव काळे,यावेळी उपस्थित आ.भारत भालके,नागेश भोसले,प्रतिष्ठाणचे संस्थापक डि.राज सर्वगोड आदी उपस्थित होते.

***********