स्वतःची वाट स्वतःच निर्माण करा - जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे स्वेरीत क्रांतीज्योती महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती साजरी

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर –‘ भाषण ऐकताना आपण वक्ता व्हावं, गीत ऐकताना आपण गायक व्हावं,कारण स्वप्न व वास्तव यांच्यामध्ये एक  जग उभे आहे आणि या जगाला समजून  घ्यायचे  असेल तर अवास्तव स्वप्न पाहू नका आणि स्वप्न पहायचेच असेल तर असे पहा कि जे तुमच्या घामातून उभे राहील. आणि त्यातूनच एक इतिहास लिहिला जाईल कारण लढणारे जीवनच आपल्या जीवनाची जडण घडण करीत असतात.आयुष्यात इप्सित ध्येय गाठायचे असेल तर स्वतःची वाट स्वतःच निर्माण करावी लागेल .’ असे प्रतिपादन ,जेष्ठ पत्रकार,जेष्ठ साहित्यिक श्री उत्तम कांबळे यांनी केले.
        येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संस्थेअंतर्गत असणार्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पदविका), कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका), पंढरपूर या महाविध्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘यंग इन्स्पीरेशन नेटवर्क’(YIN)च्या माध्यमातून व क्रांतीज्योती महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजिलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,जेष्ठ साहित्यिक श्री कांबळे आपले विचार मांडत होते. महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.या  ‘स्वतःची वाट स्वतःच  तयार करा,वाट उसनवारीवर घेवू नका’ या संदेशाद्वारे श्री कांबळे विध्यार्थ्यांना सर्वप्रथम प्रेरित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड तानाजी ठोंबरे होते. या कार्यक्रमात नुकतेच निधन आलेले साहित्यिक प्रा यशवंत सुमंत यांना श्रद्धांजली वाहिली.प्रा.यशपाल खेडकर यांनी संपादक कांबळे यांच्या दिर्घानुभव सांगितला. ‘यंग इन्स्पीरेशन नेटवर्क’चे प्रमुख सृष्टी बागल यांनी वाय.आय.एन.च्या स्थापनेपासूनची आत्ता पर्यंतची वाटचाल सांगून समाजात सकारात्मक बदल करण्यासाठी वाय.आय.एन. ची स्थापना केल्याचे स्पष्ट केले.यावेळी विकी कांबळे यांच्या ‘जीवनरंग’ या वास्तववादी कविता संग्रहाचे जेष्ठ साहित्यिक कांबळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. श्री कांबळे यांनी त्यातील ‘जीवन असावं माणसासारखं’ या कवितेतील भावार्थ स्पष्ट केला. प्राची कुलकर्णी यांनी वाय. आय. एन. व्यासपीठामुळे उत्साहित व प्रेरित झाल्याचे सांगून विशेषतः ग्रामीण भागातील समस्या मांडण्यासाठी स्थापन केलेले व्यासपीठ असल्याचे सांगितले. संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून स्वतःची वाट स्वतः निर्माण करा यावर मत मांडले.पुढे बोलताना  श्री कांबळे म्हणाले कि, ‘पाय व्यवस्थित जमिनीवर ठेवा अपघात होणार नाहीत, पंख असून उपयोग नाही पंखात उडण्याचे बळ येण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करायला हवा. देश आणि राष्ट्र वाचविण्यासाठी स्वतःला ओळखण्याची गरज आहे. सर्व काही उपलब्ध असताना मनात जिद्ध निर्माण करावी लागते.कथा तर सर्वच जण लिहितात पण,कहाणी लिहून सर्व सामान्य माणसेच इतिहास घडवितात.असे सांगून जेष्ठ साहित्त्यिक कांबळे यांनी अकबर- बिरबल,कबिरांचे दोहे, गालिबची शायरी, साहित्य,कविता यांचा पुरेपूर वापर करून युवकांची शक्ती जागृत केली. शब्दांना आकार, अर्थ, गती, किम्मत, धार असते. शब्द पेटवतातही आणि विझवतातही यासाठी शब्द शब्द जपून वापरावेत. असे आवाहन करून त्यांनी देश तरूण पिढीवर अवलंबून असल्याचे सांगितले.अध्यक्ष स्थानावरून बोलताना कॉम्रेड ठोंबरे म्हणाले.’देश हा महासत्तेच्या दिशेने वाटचाल

करत असताना आपण संभ्रमाच्या युगातून जात आहोत.’असे सांगून स्वातंत्र्य समतेच्या क्रांतीचा इतिहास तरुणांनीच घडविला असल्याचे स्पष्ट केले. यावेळी संपादक दयानंद माने, डॉ.ढाणे, महाराज, पत्रकार अभय जोशी,अरविंद जोशी,प्रा भरत चौगुले, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे,पालक संघाचे दैठणकर,प्रा.कुलकर्णी, प्रा.नागणसुरकर, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी प्रा. ए.जी. कोरके, वाय. आय. एन.चे आशुतोष कटारे, अजित लोखंडे, विध्यार्थी विद्यापीठ प्रतिनिधी साहिल भगत,यांच्यासह अधिष्ठाता, विभाग प्रमुख प्राध्यापकवर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन समाधान गायकवाड व संकल्प मस्के यांनी केले तर स्वप्निल देसाई यांनी आभार मानले.श्री कांबळे यांनी क्रांतीसूर्य फुले यांच्या समाजाभिमुख कार्याची,त्यागाची व योगदानाची माहिती देवून त्यांचा ‘ज्योतिबा’ ऐवजी ‘ज्योतीराव’ असा उल्लेख करावा असे सांगितले.  
छायाचित्र – १.विद्यमाने ‘यंग इन्स्पीरेशन नेटवर्क’(YIN)च्या माध्यमातून व क्रांतीज्योती महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजिलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन करताना जेष्ठ पत्रकार,जेष्ठ साहित्यिक श्री उत्तम कांबळे सोबत डावीकडून संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संपादक दयानंद माने, कॉम्रेड तानाजी ठोंबरे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे व आदी २. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करताना जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल व आदी. ३.४.५.व ६ विध्यार्थ्याना मार्गदर्शन करताना जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळेसोबत डावीकडून भगत, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे , संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, ‘यंग इन्स्पीरेशन नेटवर्क’चे प्रमुख सृष्टी बागल व आदी मान्यवर ७. जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल सोबत डावीकडून संपादक दयानंद माने, संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, दैठणकर, कॉम्रेड ठोंबरे, पत्रकार अभय जोशी व आदी.

************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 11 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 83 हजार 577 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 893  झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399