पंढरपूर मर्चंट बँकेने 2 कोटी 50 लाख नफा मिळवीला
पंढरपूर लाईव्ह- :
पंढरपूर:- पंढरपूर मर्चंट बँकेने सन 2014-2015 या अर्थिक वर्षात आपली प्रगतीची घौडदौड कायम ठेवत आय.एम.पी.एस.सेवा तत्काळ सुरु करण्यास यशस्वी ठरल्याबद्दल देशभरातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला असुन पारदर्शी व चोख कारभार करीत बँकेने 2 कोटी 50 लाख नफा मिळवीला आहे.अशी माहीती पंढरपूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पवनलाल फडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बँकेच्या प्रगतीचा आलेख समोर मांडताना अध्यक्ष राजेंद्र फडे म्हणाले की,बँकेच्या प्रधान कार्यालयासह सद्य 6 शाखा कार्यरत असुन लवकरच पंढरपूर शहराच्या उपनगरात व सोलापूर शहरात शाखा विस्तार करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगीतले.बँकेच्या प्रगतीची आकडेवारी सादर करताना ते म्हणाले की,सद्या बँकेकडे 121 कोटी 26 लाखांच्या ठेवी आहेत.तर कर्जवाटप 73 कोटी 20 लाख इतके आहे.बँकेचे भागभांडवल 1 कोटी 42 लाख 76 हजार इतके आहे.बँकेचे खेळते भांडवल 1 कोटी 47 लाख 12 हजार असुन बँकेने 55 लाख 44 हजार रुपयांची गुंतवणुक केली आहे.बँकेने एन.पी.ए.शुन्य टक्के राखत अॅडीट वर्ग अ प्राप्त केला असुन ढोबळ नफ्यातही वाढ करीत 2 कोटी 50 लाख रुपयांचा नफा झाल्याची माहीती राजेंद्र फडे यांनी दिली आहे.
पंढरपूर मर्चंट बँकेने शहर व ग्रामिण भागातील गरजुंना
वेळेवर मदत केली असुन विद्यमान संचालक मंडळाने ग्राहकांना अत्याधुनिक व
जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.याचाच एक भाग म्हणुन
बँकेने कोअर बँक प्रणालीचा स्विकार केलेला असुन आर.टी.जी.एस.तसेच
एन.ई.एफ.टी.,एस.एम.एस.अर्लट व आय.एम.पी.एस.अर्थाततत्काळ पेमेंट सुविधा ही
सेवा सुरु केली आहे.बँकेने सुर केलेल्या एटीएम सेंटर अर्तंगत देशात कोठुनही
1 लाख 80 हजार ए.टी.एमसेंटर मधुन रक्कम काढता येते.बॅक लवकरच डेबीट कार्ड
सुविधा देणार आहे.बँकेने सभासद कल्याण निधी योजना सुरु केली आहे.बँकेने
मागील सलग तीन वर्षे सभासदांना 15 टक्के लाभांश आदा केला आहे.
या पत्रकार परिषदेस बँकेचे उपाध्यक्ष मारुती देशमुख,संचालक सिध्देश्वर आंबरे,सोमनाथ डोंेबे,संजय भिंगे,राजकुमार डांगे,पांडुरंग शिंदे,विजयकुमार परदेशी,आनंद शेटे,विजयकुमार कोठारी,राजेंद्रगीर गोसावी,हुसेन पटवेकरी,मंजुश्री भोसले,भानुदास डवरी,अमरजीत पाटील,दिनेश गायकवाड आदी उपस्थित होते.शेवटी बँकेचे मॅनेंजर अतुल म्हमाणे यांनी आभार मानले.
या पत्रकार परिषदेस बँकेचे उपाध्यक्ष मारुती देशमुख,संचालक सिध्देश्वर आंबरे,सोमनाथ डोंेबे,संजय भिंगे,राजकुमार डांगे,पांडुरंग शिंदे,विजयकुमार परदेशी,आनंद शेटे,विजयकुमार कोठारी,राजेंद्रगीर गोसावी,हुसेन पटवेकरी,मंजुश्री भोसले,भानुदास डवरी,अमरजीत पाटील,दिनेश गायकवाड आदी उपस्थित होते.शेवटी बँकेचे मॅनेंजर अतुल म्हमाणे यांनी आभार मानले.