पंढरपूर रांझणी रस्त्यावर अपघात 1 ठार दोन जखमी

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर-रांझणी मार्गावर आज रात्री दि. 10 एप्रिल2015 ला सफारी आणि मोटारसायकल च्या समोरासमोर झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एकजण जागीच ठार झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर ते रांझणी मार्गावर आज रात्री टाटा सफारी आणि मोटारसायकलचा चळे पाटीजवळ समोरासमोर अपघात झाला असून मोटारसायकल वरील बळीराम विष्णु शिरगुर (रा.आंबे वय-35)ता. पंढरपूर हे जागीच ठार झाले असून विष्णु पांडुरंग सुरवसे आणि पांडुरंग आण्णा दांडगे (रा.आंबे वय-35)ता. पंढरपूर हे जखमी झाले आहेत.

यातील टाटा सफारी (क्र. एम एच- 09 बी एम 1564)  चालक फरारी असून अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड हे करत असल्याची  अधिकृत माहिती पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार चव्हाण यांच्याकडून समजली. मात्र तालुका पोलिस स्टेशनचे सर्वेसर्वा गावडे साहेब हे सोलापूर मध्ये असून त्यांना अपघात झाल्याचे माहित आहे मात्र त्यांना याबाबत अधिक डिटेल्स् माहित नसून तात्पुरता तपास पोलिस हवालदार गायकवाड यांच्याकडे दिल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याकडून समजली.

**************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 10 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 82 हजार 613 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 760 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399