औरंगाबाद चे नांव ‘संभाजी नगर’ करा-शिवसेना आक्रमक

पंढरपूर लाईव्ह:-

Sunday, 22 March 2015

औरंगाबाद: औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं शिवसेना नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडण्याची विनंतीही केली असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं आहे.


औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा या मागणीसाठी शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. तसेच येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवसेनेचं मराठीप्रेम उफाळून आल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे.

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा रंगण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेची ही मागणी भाजप मान्य करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
  

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.22 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   76 हजार 872 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 980 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.