बळीराजासाठी आनंदाची वार्ता-‘यंदा पाऊस-पाणी’ चांगले...

पंढरपूर लाईव्ह:-

Sunday, 22 March 2015

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमी पावसाबद्दलची आहे.
स्कायमेट या संस्थेने नोंदलेल्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी दुष्काळ किंवा अतिवृष्टी होण्याचीही कोणती चिन्हे दिसत नाहीत.
अल निनो वादळामुळे 2002, 2004 आणि 2009 साली दुष्काळी  उद्भवली होती. पण यावर्षी अल निनोचा प्रभाव कमी असण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.
त्यामुळे सततच्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना स्कायमेटच्या वर्तवलेल्या अंदाजामुळे थोडा तरी दिलासा मिळेल.

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.22 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   76 हजार 872 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 980 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.