पंढरपूर शहर व परिसर.. अतिमहत्वाची माहिती... भाविक-भक्तांच्या सेवेत... पंढरपूर लाईव्ह ची भेट

पंढरपूर लाईव्ह

पुंडलिकासाठी परब्रम्ह आले। भक्ताचिया काणा  विटेवरी ठेले ॥
पुंडलिका साठी परब्रम्ह आले. भक्ताचिया काणा विटेवरी ठेले. तर असे या पांडुरंगाच्या अवताराचे वर्णन संतांनी केले आहे. आई वडिलांच्या अत्युच्च सेवेचा परमोच्च अशा शिखराचा कळस कळसच शोभावा असं पुंडलिकाचं महात्म्य वैष्णवाच्या मनामनात असतं, पुंडलिकाला भेटायला आलेल्या आणि त्याच्या भेटीसाठी रामचरणी उभा असलेल्या पंढरीनाथाची महती काय वर्णावी? आपणा सारख्या संसारात अडकलेल्या माणसाचं सोडाच पण ‘‘ अठराहि भागले, सहाहि शिणले,चारहि राहिले मौनाचि!‘‘ सहा शास्त्रे अठरा पुराणे,चार वेद यांनाहि ते जमले नाही. म्हणून संत एकनाथ म्हणतात ‘पुसु नका बाई वेदासी कांही कळलेच नाही,शेष शिणला झाल्या सहस्त्र जिभा, देव का हो विटेवर उभा !

कसे याल ? पंढरपूरमध्ये येण्याचे मार्ग. व प्रवास सुविधा..

      पंढरपूर हे शहर सोलापूर जिल्ह्यात असून भौगोलिक दृष्ट्या ते पश्चिम महाराष्ट्रात येते.  पंढरपूर हे शहर वेगवेगळ्या रस्त्यांनी जोडलेले आहे.
प्रमुख रस्ते मार्ग खाली नमूद केलेप्रमाणे आहेत.
         
  1) प्रमुख रस्ते -
 

  • सोलापूर- मोहोळ- पंढरपूर - 74 कि.मी.
  • कुर्डुवाडी- शेटफळ- पंढरपूर -  48 कि.मी.
  • पुणे- सासवड- जेजुरी- फलटण- माळशिरस- पंढरपूर - 210 कि.मी. 
  • पुणे- भिगवण- इंदापूर- टेंभुर्णी- पंढरपूर - 207 कि.मी.
  • मुंबई- पुणे- भिगवण- इंदापूर- टेंभुर्णी- पंढरपूर - 357 कि.मी.
  • कोल्हापूर- सांगली- सांगोला -पंढरपूर -  188 कि.मी. 
  • नाशिक- सिन्नर- संगमनेर- नगर- करमाळा-टेंभुर्णी- पंढरपूर- 380 कि.मी
  • नगर -  करमाळा -  टेंभुर्णी - पंढरपूर - 195 कि.मी.
  • शिर्डी - राहूरी - नगर - करमाळा - टेंभुर्णी - पंढरपूर - 273 कि.मी
  • औरंगाबाद - नगर - करमाळा - टेंभुर्णी - पंढरपूर -  294 कि.मी
  • नांदेड - लातूर - उस्मानाबाद - सोलापूर - मोहोळ - पंढरपूर -  328 कि.मी
  • तुळजापूर - सोलापूर - मोहोळ - पंढरपूर - 113 कि.मी.
  • गाणगापूर - अक्कलकोट - सोलापूर - मोहोळ - पंढरपूर -  185 कि.मी
  • शेगाव - खामगाव - जालना - बीड - बार्शी-  पंढरपूर -  457 कि.मी
  • नागपूर- अकोला- खामगाव- जालना- बीड- बार्शी- पंढरपूर -  737 कि.मी
  • बिजापूर - झळकी  -मंगळवेढा -  पंढरपूर - 115 कि.मी.
  • हैद्राबाद - उमरगा -  सोलापूर - मोहोळ - पंढरपूर - 370 कि.मी

पंढरपूर बस स्थानक ते मंदिर नकाशा


रेल्वे मार्ग -

         पंढरपूर हे दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील कुर्डूवाडी या रेल्वेजंक्शन ने जोडलेले आहे. तसेच मिरज - पंढरपूर रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. या मार्गावर धावणाऱ्या प्रमुख रेल्वे
  • मुंबई- पंढरपूर 
  • मिरज -पंढरपूर
  • लातुर - पंढरपूर
  • उस्मानाबाद - पंढरपूर
3) हवाई मार्ग -
पंढरपूर पासून जवळ असणारी विमानतळे 
  • सोलापूर- 75 कि.मी. 
  • पुणे -210 कि.मी.  
................................

पंढरपूरमध्ये आल्यानंतर आपणास कोणत्याही प्रकारची गरज पडल्यास किंवा कांही अडचण आल्यास आमच्याशी थेट कॉन्टॅक्ट करा...

भगवान गणपतराव वानखेडे

मुख्य संपादक:- पंढरपूर लाईव्ह

(पंढरपूरचे पहिले ई-न्यूज वेब पोर्टल)

संपर्क क्रमांक:-

8308838111

8055434499

8552823399

mail id

jhanjavat@gmail.com

livepandharpur@gmail.com


कांही महत्वाचे टेलिफोन क्रमांक

पंढरपूर शहर पोलिस स्टेशन
:- (02186) 223443
तालुका पोलिस स्टेशन, पंढरपूर
:- (02186) 223559
उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर
:- (02186) 223855
प्रांताधिकारी कार्यालय
:- (02186) 223229
तहसिल कार्यालय
:- (02186) 223556
मुख्याधिकारी नगरपरिषद, पंढरपूर
:-(02186) 223013
उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर
:-(02186) 223181, 225101

‘‘ माझा शिणभाग अवघा हरपला, विठोबा देखिला विटेवरी ’’ 

आतापर्यत जो प्रपंचाचा शीण होता,प्रपंच्याच्या कटकटी ज्या मनाला सतावित होत्या त्या पुर्ण नष्ट झाल्या ! बा पांडुरंगा तुझ्या दर्शनाने मला पुर्ण सुख लाभले.इतके लाभले की देवा तू सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वर आहेस. आणि हे देवा मला सतत तुझ्या सान्निध्य ठेव ! की पंढरीचा वास,चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे,हेचि मज घडो जन्मोजन्मांतरी! मला सतत तुझ्या चरणापाशी ठेव हेच माझे तुला मागणे आहे.तुझ्या चरणाचे दर्शन मला जन्मोजन्मी घडू दे !

पुंडलिका वरदे... हरिऽऽ विठ्ठल... श्रीज्ञानदेव तुकाराम।
पंढरीनाथ महाराज की जय।
॥शुभं  भवतु॥

**

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com