सौ सुवर्णा बागल यांची राष्ट्रवादी किसान सभेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड

पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2019

पंढरपूर- महाराष्ट्रात आता महिला मोठ्या संख्येने सर्वच क्षेत्रात आपली कामगिरी बजावत असताना लक्षवेधी कार्य करत आहेत. यामध्ये पंढरपूर तालुका काही वेगळा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या राजकीय कार्याने प्रभावित होवून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सौ सुप्रिया ताई पवार यांच्या कार्याची प्रेरणा घेत गादेगाव (ता. पंढरपूर) मधील सौ सुवर्णा सत्यवान बागल ह्यांनी देखील सामाजिक क्षेत्रात कार्य सुरु केले. त्यांची कार्यातील प्रामाणिकता पाहून घौडदौड पाहून त्यांची धडपड व तळमळ पाहून पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष शंकर धोंगडे यांच्या आदेशाने महिला आघाडीचे प्रमुख विजयाताई भोसले यांनी सौ सुवर्ण बागल यांची थेट राष्ट्रवादी किसान सभेच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली असून त्यांच्या कार्याला आता नव्या जबाबदारीमुळे गती मिळनार आहे.




सौ सुवर्ण बागल यांचे माहेर शेटफळ (ता. मोहोळ) असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहरभाऊ डोंगरे यांची पुतणी आहे तसेच सासर गादेगाव (ता. पंढरपूर) असून सामाजिक कार्यकर्ते महादेवभाऊ बागल यांच्या धाकट्या स्नुषा आहेत. एकूणच माहेर व सासर या दोन्हीबाजूने  राजकीय व सामाजिक कार्याचे धडे सौ सुवर्णा बागल यांनी गिरवून आपल्या कार्याची ओळख सोलापुर जिल्ह्याला यापूर्वीच करून दिली आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ. सुवर्णा बागल यांनी बालपणापासूनच सामाजिक व राजकीय कार्याचे धडे घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा व गरीब जनतेचा विकास कसा होईल याकडे देखील लक्ष देत आहेत. असे असताना आपल्या दोन्ही मुलांचा वाढदिवस देखील त्या वृद्धाश्रम व बालकाश्रम मध्ये साजरा करतात. पैशाचा अपव्यय न होता त्यामध्येच अधिक जण कसा आनद घेतील ? याकडे सौ. बागल यांचा कल दिसत असतो. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलींना देखील शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करून येणारा खर्च देखील स्वतः उचलतात. असे अनेक लक्षवेधी भूमिका पाहून सौ सुवर्णा बागल यांच्या गळ्यात वरिष्ठ नेते मंडळींनी राष्ट्रवादी किसान सभेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने सोपविली आहे. 

जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचे विधान परिषदेचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे, कार्याध्यक्ष राजाबापू पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष हनुमंत पवार, जेष्ठ नेते व जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे, ओबीसी सेलचे महिला अध्यक्षा साधना राऊत, महिला राष्ट्रवादी उपाध्यक्षा सौ. अनिता नागणे, तालुका अध्यक्ष सौ. अनिता पवार आदी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून जिल्ह्यामध्ये सौ. बागल यांचे अभिनंदन होत आहे. यामुळे आता महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत असून जिल्ह्याला आणखी एक महिला नेत्या मिळाल्या आहेत. यामुळे पंढरपूर तालुक्यात विशेषतः महिला वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com