महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेची पोस्ट खात्यामार्फत आधार लिंक करण्याचे टायमिंग वाढवून देण्याची मागणी

पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2019


पंढरपूर । प्रतिनिधी,
भारतीय डाक विभाग यांच्याकडून आधार लिंक करण्याचे काम पंढरपूर येथील कार्यालयात नाममात्र शुल्क आकारून सुरू आहे. यासाठी सकाळी 10 ते 12 हा 2 तासांचा अवधी देण्यात आलेला आहे. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थी, बचत गटातील महिला व इतर गरजू यांना केवळ 2 तासांत आधार लिंक करण्यासाठी अवधी मिळत असून या वेळेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक येत असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. आधार लिंक करण्याची टायमिंग वाढवून देण्याची मागणी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांनी पोस्ट मास्तर संतोष खुणे यांच्यामार्फत डाक विभाग पंढरपूरचे अधिक्षक एन.रमेश यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.



यावेळी ओबीसी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रा.अशोक डोळ, सुभाष गायकवाड, इरकल, उपाध्यक्ष बालाजी देशमाने, धनंजय देशमाने, संतोष देवकर, अर्जुन कांबळे, सुनिल भोसले, पिंटू महागावकर, प्रशांत महागावकर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील इंटरनेट कॅफेतून ही आधार लिंक करण्याची सोय उपलब्ध आहे मात्र त्यांना त्यासाठी  सुमारे 50 रूपये घेत असल्यामुळे नागरिकांना व ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीबांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या बचत गटातील महिलांना आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत आधार लिंक करणे भाग पडत आहे. यासाठी आपण आपल्या स्तरावरून डाक कार्यालयातून 2 तासाऐवजी टायमिंंग वाढवून देवून नागरिकांना आधार लिंक करण्यासाठी शासनाच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
Attachments area





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com