हार्ड वर्क बरोबरच स्मार्ट वर्कची गरज -पोलीस उपअधिक्षक डॉ. सागर कवडे
पंढरपूर LIVE 19 जानेवारी 2019
स्वेरीत बीट्स २०१९ चे थाटात उदघाटन
पंढरपूर- ‘शालेय जीवनापासूनच पोलीस अधिकारी होण्याचे मनोमन ठरविले आणि त्या ध्येयानुसार कठोर परिश्रम सुरु केले आणि माझ्या प्रयत्नांना फळ मिळाले आणि इच्छित ध्येय गाठू शकलो. मित्रांनो, सुरवातीला वैद्यकीय क्षेत्रात संधी आणि पुढे पोलीस खात्यात मिळालेली संधी पहिली असता असे सांगावेसे वाटते की,कोणतेही काम सहज सोपे होत नसते. त्यासाठी कोणत्याही प्रसंगी आपला आत्मविश्वास ढळू न देता ‘कठोर परिश्रमा’बरोबरच’स्मार्ट वर्क’ केले तर अवघड काम सहज सोपे करू शकतो हे सिद्ध होते.’ असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधिक्षक डॉ. सागर कवडे यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या बीट्स २०१९ अर्थात कलागुणांचा मुक्त उधळण असलेल्या ‘बीट्स २०१९’ या स्नेहसंमेलनाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंढरपूर विभागाचे पोलीस उपअधिक्षक डॉ. सागर कवडे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी उदघाटक म्हणून बोलताना पुण्यातील सिमेंस इंडस्ट्रीज सॉफ्टवेअर (पी.एल.एम.) प्रा. लि. पुणे या कंपनीत सॉफ्टवेअर मॅनेजर पदावर असलेले स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिरिंगच्या २००२ च्या बॅचचे विद्यार्थी गिरीश हाम्पे म्हणाले की, ‘कोणतेही काम लहान नसून ते पूर्ण करण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे सरांनी त्यावेळी घालून दिलेल्या ‘हार्ड वर्क’च्या सवयीमुळे मला अशक्य असे काहीच जाणवले नाही आणि अवघड कार्य देखील सहज होऊ लागले. ज्यांचे स्वप्न भक्कम आहेत त्यांनी त्याचा पाठपुरावा करून यशाचे ध्येय गाठावे.’असे आवाहन केले.
पुढे बोलताना डी.वाय.एस.पी. डॉ. कवडे म्हणाले की, ‘आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपला आत्मविश्वास कमी होऊ देवू नका. पुढील आयुष्याचे नियोजन या वयातच करून ठेवा,बदलत्या काळातील आव्हाने स्वीकारून त्याचा पाठपुरावा करा. त्यासाठी अथक प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट साध्य करणे अशक्य नाही. आपण समाजात वावरताना प्रथमतः महिलांचा आदर करा.’असे देखील त्यांनी केले. प्रारंभी गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनीनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण उत्तमरीत्या केले. सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलागुणांची मुक्त उधळण केली गेली. त्यात हिंदी-मराठी भाषेतील नव्या व जुन्या गाण्यांचा समावेश देखील होता.अगदी सूत्रसंचालनापासून ते विविध नाट्यछटा सादर करेपर्यंत संस्थेच्या नियमितच्या शिस्तीला कोणतीही बाधा न आणता विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेख कलाविष्कार सादर केले.त्यात नेत्रदीपक विद्युत रोषणाई, कर्णमधुर संगीत यांचा मिलाप देखील पहायला मिळाला. पारंपारिक वेशभूषेमध्ये अनेकांनी शेतकरी,देशसेवेसाठी सदैव तैनात असलेले सैनिक,खेळाडू, पारंपारिक सण यावर आधारित वेशभूषेने कॅम्पस बहरून गेला होता.
यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, माजी विद्यार्थी बाबर यांनी देखील स्वेरीच्या गुणवत्तेचे कौतुक केले. यावेळी गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजी आसबे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, माजी अध्यक्ष व विश्वस्त डी.एस. सालविठ्ठल, माजी अध्यक्ष व विश्वस्त व्ही. एस. शेलार, सौ. रोंगे, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कोरे, इशिता महाजन, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांच्यासह इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, माजी विद्यार्थी बाबर यांनी देखील स्वेरीच्या गुणवत्तेचे कौतुक केले. यावेळी गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजी आसबे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, माजी अध्यक्ष व विश्वस्त डी.एस. सालविठ्ठल, माजी अध्यक्ष व विश्वस्त व्ही. एस. शेलार, सौ. रोंगे, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय कोरे, इशिता महाजन, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांच्यासह इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




