विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांसाठी स्नेससंमेलनाची गरज -वाहतूक पोलीस अधिकारी सारंग चव्हाण
पंढरपूर LIVE 20 जानेवारी 2019
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित बी.फार्मसी, डी. फार्मसी व डिप्लोमा इंजिनिअरींगच्या स्नेहसंमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजिलेल्या ‘बीट्स २०१९’च्या दुसऱ्या पर्वात उदघाटन प्रसंगी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी सारंग चव्हाण मार्गदर्शन करत होते. प्रारंभी सरस्वती पूजनाने सुरवात झाली. पुढे बोलताना उदघाटक पोलीस अधिकारी चव्हाण म्हणाले की, ‘स्वेरीमधून शिस्तीचे पालन होत असताना विद्यार्थ्यांनी बाहेरील विश्वात देखील वावरताना स्वेरीत पाळल्या जाणाऱ्या शिस्तीप्रमाणेच वाहतुकीचे देखील नियम पाळावेत त्यामुळे भविष्यात अपघाताचे प्रमाण कमी होतील. तसेच प्रत्येक दुचाकीस्वाराने सुरक्षीततेसाठी हेल्मेट वापरणे आवश्यकच आहे.’असे सांगून हेल्मेटचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलेद्वारे मिमिक्री, संगीत,नृत्य अशा विविध कलागुणांनी रंगमंचावर उर्जा आणली. कॉमेडी बाहुबलीने पोट धरून हसण्यास लावले.
कुटुंबातील कलह, मतभेद या विषयी भाष्य करणारे अप्रतिम नाटक सादर करून आजही ‘एकत्र कुटुंब पद्धती असणे’ही काळाची गरज आहे हे पटवून दिले. ‘गाढवाचे लग्न’ या नाटकातून उत्तम करमणूक केली. विद्यार्थी प्रत्येक सादरीकरणाला साजेसे सूत्रसंचालन करत होते. तसेच ‘पालवी’ संस्थेच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या देशप्रेमी गीतांना विद्यार्थी व प्रेक्षकांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला तर भारतीय संस्कृती दर्शविणारे विविध पोशाखाचे‘पारंपारिक वेशभूषा’ मध्ये दर्शन दिले. एकूणच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांनी दुसऱ्या दिवशी देखील स्वेरी कॉलेज कॅम्पस दणाणून गेले होते. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. एस. डी. भिंगारे, प्रा. एच.बी.बनसोडे, विद्यार्थी सचिव तस्मैय्या आतार, सौरव बनगर यांच्यासह डिप्लोमा इंजिनिअरींग आणि फार्मसीचे डिप्लोमा व डिग्री यामधील विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com