तुला पाहते रे मालिकेत येणार विक्रांत ची पहिली पत्नी, पहा कोण आहे विक्रांत सरंजामेंची पहिली पत्नी

पंढरपूर LIVE 20 जानेवारी 2019


सध्या गाजलेली मालिका “तुला पाहते रे” ने टीआरपी चा उच्चांक गाठला आहे. यामधील विक्रांत आणि ईशा यांचे लग्न होणार असल्याने त्यांची लग्नाची तय्यारी जोरात सुरु आहे. असे आनंदाचे वातावरण असताना या मालिकेत एक नवीन घडणार आहे ते म्हणजे विक्रांत ची पहिली पत्नी. मालिकेमध्ये विक्रांत आपल्याहून निम्म्या वयाच्या मुलीशी खूप प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करत आहे असे दाखवले आहे. लोकांना लग्नाची आतुरता देखील खूप आहे पण यात अडथळा येणार का हे आपल्याला पाहायचे आहे.


आतापर्यंत या मालिकेमध्ये फक्त वर्तमानकाळ दाखवण्यात आला आहे पण आता विक्रांत सरंजामे यांचा भूतकाळ उलगडणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार मालिकेत विक्रांत सरंजामी ची पहिली पत्नी ‘राजनंदिनी’ ची अंतरी होणार आहे. विक्रांत सरंजामी यांचा शत्रू जालिंदरशी निगडीत तिची भूमिका असेल. राजनंदिनीची भूमिका “शिल्पा तुळसकर” हि अभिनेत्री साकारणार असून तिची धमाकेदार एंट्री आपल्याला पाहायला मिळेल.

शिल्पा तुळसकर हि एक अभिनेत्री आहे तिने अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. शिल्पा तुळसकर चे वय ४१ वर्षे आहे अभिनयाचा उत्तम अनुभव असणारी शिल्पा प्रसिद्ध मालिकेत आपला उत्तम अभिनय नक्कीच सादर करेल. शिल्पा तुळसकर ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील याची माहिती दिली होती आणि व्हिडिओ देखील शेअर केला होता त्यावर अनेकांनी तिच्या एन्ट्रीची वाट पाहत असल्याचा प्रतिसाद दर्शवला आहे. आता या मालिकेत शिल्पा तुळसकर म्हणजेच राजनंदिनी विक्रांत आणि ईशा च्या आयुष्यात विघ्न आणते का कि चांगले भूमिका पार पडते हे आपल्याला तिच्या येण्यावरूनच कळेल.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com