राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसिल कार्यालय पंढरपूर येथून जनजागृतीपर रॅली... मतदार यादीत नांव नोंदविण्याचे तहसिलदार मधुसूदन बर्गे यांचे आवाहन

पंढरपूर LIVE 26 जानेवारी 2019

🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!

🇮🇳जय हिंद...!  वंदे मातरम्...


            पंढरपूर  दि. 25- भारतीय राज्यघटनेने वयाची 18 वर्षे पुर्ण करणार्‍या व्यक्तीला मतदान करण्याचा  हक्क दिला आहे. मतदानाचा हक्क बजवाण्यासाठी प्रत्येकाने मतदार  नोंदणी करावी असे आवाहन तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी केले. 



राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसिल कार्यालय पंढरपूर येथून मतदार नोंदणी व मतदानाबाबत काढण्यात आलेल्या जनजागृतीपर रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे, उप कार्यकारी अभियंता हनुमंत बागल, मंडलाधिकारी समिर मुजावर, तलाठी समाधान शिंदे, तहसिल कार्यालयाचे समीर भागवत फंड, राजेश सावळे, यांच्यासह  विविध विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

    लोकशाही प्रक्रियेमध्ये नवमतदारांचा सहभाग वाढावा. यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपले नांव मतदार यादीत नोंदविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लोकशाही प्रबळ व बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे.

             रॅली तहसिल कार्यालय येथून आंबेडकर पुतळा, सावरकर चौक मार्गे  शिवाजी चौकात पोहोचली. शिवाजी चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत पंढरपूर शहरातील विविध विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com