विंटर जॅकेटमध्ये नवीन ट्रेंड्सची चलती

पंढरपूर LIVE 21 जानेवारी 2019

थंडीच्या दिवसांतला सगळ्यात आवडता ट्रेंड म्हणजे जॅकेट. सध्या असलेलं मस्त थंड वातावरण पाहता हा ट्रेंड फॅशनबरोबरच तुमची, तुमच्या त्वचेची काळजी घेतो. तुम्ही जे जॅकेट घालता, ते तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगते. वूनिकच्या मुख्य स्टायलिस्ट भव्या चावला यांनी या मोसमातील निवडक ट्रेंड एकत्र करून तुमच्यासाठी आणले आहेत, जे या थंडीत तुमच्या सोबतीस असतील:






१.पफर
या थंडीतले हे सर्वात ट्रेंडी असे जॅकेट खूप आरामदायक आणि उबदार आहे. पूर्वी स्कीइंगसाठी वापरले जाणारे हे जॅकेट आता जिथे खूप कडाक्याची थंडी असते अशा ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरते आहे. या मोसमात तुमचे नेहमीचे काळे जॅकेट आणि लोकप्रिय होत चाललेली रंगीत जॅकेट आलटून पालटून घालत रहा. काळी जॅकेट ही केव्हाही उत्तमच असतात व ती सुसंस्कृत आणि औपचारिक लुक देतात तर इतर सर्व ठिकाणी रंगीत जॅकेट घालता येतात.
२.बोल्ड चेक्स
चौकडीची जॅकेट आमच्या अनेक हिवाळी वॉर्डरॉबमध्ये सामील असतात. यंदाच्या मोसमात ही चौकडी अधिक ठळक आणि उठावदार झाली आहे. क्लासी आणि अत्याधुनिक दिसण्यासाठी टर्टल-नेक सोबत हे जॅकेट घाला. जर तुम्हाला ही चौकडी खूप पुरुषी वाटत असेल तर फुलाफुलांच्या किंवा नाजुक ब्लाऊजवर आणि नाजुकश्या कानातल्यांसोबत ते घाला.

 ३.फ्लीस
सध्या थंडी असल्यामुळे तुम्हाला फ्लीस जॅकेट सगळीकडे दिसत असेल पण यंदाच्या मोसमात त्याचा अधिकृत ट्रेंड आहे, विशेषतः प्रिंटेड फ्लीस किंवा सुशोभित व कलाकुसर केलेल्या फ्लीसचे चलन आहे. लोकर किंवा शर्लिंगच्या विपरीत फ्लीस हे पुर्णपणे कृत्रिक असते, त्यामुळे ते ऊब धरून ठेवते. ते वजनात देखील हलके असते आणि धुतल्यावर वाळते देखील लवकर. तुम्ही त्यात वेगवेगळे रंग आणि पॅटर्न वापरुन बघू शकता, विशेषतः अॅनिमल प्रिंट्स, ज्या सर्वत्र दिसतात आणि आता फ्लीसमध्ये देखील आढळून येऊ लागल्या आहेत.डेनिम आणि बुटांवर हे जॅकेट घातलेत की तुम्ही तैयार!
४.भारतीय वस्त्र
जर तुम्ही अशा भागात राहात असाल, जेथे खूप जास्त थंडी नसेल, तर इकत आणि बाटिक सारख्या कापडातील आधुनिक भारतीय फॅशनची जॅकेट तुम्ही वापरू शकता. ही जॅकेट सुती असली तरी, त्यात गुरफटून बसले की, छान ऊब मिळते. ही जॅकेट तुम्हाला कलात्मक आणि तरी फॅशनेबल लुक देतात. कामावर जाताना ट्राउझर, पेन्सिल स्कर्ट किंवा डार्क डेनिमसोबत ही जॅकेट घाला.

५.बेल्टेड
जेव्हा ट्रेंच कोटचा विचार केला जातो तेचा बेल्टेड हे येतेच. जॅकेट कमरेशी बांधून मग थोडे सेल ठेवण्याची त्यात कल्पना असते. घट्ट जीन्स किंवा चांगल्या फिटिंगच्या पॅंटसोबत ही जॅकेट शोभून दिसतात व तुम्ही त्यात जाड दिसत नाही.




महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com