रेल्वे प्रवासी व अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे नेते प्रशांत बोरकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत
पंढरपूर LIVE 26 जानेवारी 2019
🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
🇮🇳जय हिंद...! वंदे मातरम्...
फुले,शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था रावेर यांचे तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जीवन गौरव पुरस्कार चे सन्मानपत्र प्रशांत बोरकर यांना देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी पत्रकारिता, सामाजिक आदी विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबदद्गदल तहसीलदार श्री. ढगे व पोलीस अधिकारी वाकोडे यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी रावेर न.पा. चे मुख्याधिकारी सर्व मान्यवर माजी नगराध्यक्ष पदमाकर महाजन, अशोक शिंदे , दिलिप कांबळे, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे , डीडी वाणी बहुजन महासंघ बाळू शिरतुरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
रेल्वे प्रवासी व अखिल भारतीय ओबीसी महासंघ चे नेते प्रशांत बोरकर यांना असंख्य पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यांनी विविध संस्था आणि वृत्तपत्रा चे प्रतिनिधित्व केलेले आहे. ‘तरुण तडफदार’ या वृत्तपत्राचे त्यांनी वीस वर्षे यशस्वी संपादन केले आहे. अनेक सामाजिक, कामगार संघटना, प्रवासी संघटना चे नेतृत्व त्यांनी केले आहे. यापूर्वी जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे ही त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच पहिला जळगाव जिल्हा युवा पुरस्कार ,समर्थन मुंबई मानवी हक्क जागरूकता मान चिन्ह , रेड ऍड व्हाइट राष्ट्रीय बहादुरी पुरस्कार, दर्पण पुरस्कार , नेहरू युवा पुरस्कार , आदी असंख्य त्यांना पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांनी सतत तीस वर्षे सामाजिक पत्रकारिता, ग्राहक मानवी हक्क व हॉटेल कामगार, वन कामगार, सफाई कामगार, विमा प्रतिनिधी, सामाजिक न्याय व आदिवासी व वंचित गोर गरीब समाज महिलांना प्रवासी यांना त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रावेर परिसरातील विविध सर्व जाती धर्मातील जनतेसाठी नि:स्वार्थीपणाने ते नेहमीच धडपडत असतात. त्यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यासाठी पंढरपूर लाईव्हकडून हार्दिक शुभेच्छा !
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




