पेटीएमचा ऑनलाईन फूड ऑर्डरिंग क्षेत्रात प्रवेश

पंढरपूर LIVE 20 जानेवारी 2019


~ झोमॅटोसह भागीदारी करीत ऑनलाईन फूड ऑर्डरिंग सेवेचा केला प्रारंभ ~
~ पेटीएमद्वारे आपल्या आवडत्या रेस्टोरंटमधून जेवण / खाद्यपदार्थ ऑनलाइन ऑर्डर करण्याची सुविधा ~
मुंबई, जानेवारी २०१९: पेटीएम ह्या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपनीची मालकी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज जाहीर केले की झोमॅटोशी त्यांनी भागीदारी केली असून त्यांच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून फूड आणि डिलिव्हरी ऑर्डर करता येईल. यामुळे यूझर्स आता आपल्या पेटीएम अॅपमधून आपले आवडते रेस्टोरंट शोधून तत्काळ खाद्यपदार्थ मागवू शकतील. ही सेवा सध्या दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांसाठी पेटीएम अँड्रॉइड अॅपवर सक्रिय झालेली आहे आणि लवकरच ती भारतभरात आणि पेटीएम आयओएस अॅपवर देखील सक्रिय होईल.


टियर २ आणि टियर ३ शहरांत पेटीएमचा मोठा यूझरबेस आहे, जो आपल्या विविध प्रकारच्या दैनंदिन पेमेंटसाठी या सेवा वापरतो. ही नवी सेवा दाखल करून पेटीएमने आपल्या ग्राहकांना ऑनलाइन फूड ऑर्डरिंगची सुविधा दिली आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या विशाल यूझर-बेसद्वारा ह्या सुविधेचा अंगिकार होऊन कंपनीच्या वृद्धीस हातभार लागेल.
पेटीएमच्या उपाध्यक्ष रेणू सत्ती म्हणाल्या, “झोमॅटोसह भागीदारीच्या मदतीने आमच्या अॅपवरून ऑनलाइन फूड ऑर्डरकरण्याची सोय झाली आहे. आमच्या ग्राहकांपैकी मोठ्या प्रमाणातील ग्राहक हे टियर २ आणि टियर ३ शहरांतील आहेत. आम्हाला विश्वास आहे की या सहयोगानंतर ऑनलाइन फूड ऑर्डरिंगमधील वाढ आम्ही आणखी जोमाने पुढे नेऊ.आमच्या ग्राहकांना सर्व प्रकारची सेवा देण्याच्या आमच्या प्रयासातील देखील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही या दिशेने आमचे प्रयत्न सदैव सुरू ठेवू.”

झोमॅटो फूड डिलिव्हरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित गुप्ता म्हणाले, “पेटीएम हा सर्वाधिक लोकप्रिय पेमेंट मंच आहे, ज्यांची पोहोच देशाच्या कान्या-कोपर्या पर्यंत आहे. त्यांच्याशी भागीदारी करून आमची ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा त्यांच्या मोबाइल अॅपशी जोडण्यास आम्ही उत्सुक आहोत. यामुळे आम्ही आणखी मोठ्या यूझर-बेसपर्यंत पोहोचू शकू आणि झोमॅटोवरून ऑर्डर करण्याचा एकंदर अनुभव अधिक चांगला करू शकू.”
     फूड आणि बेव्हरेजिस हा पेमेंटचा असा वर्ग आहे, जो व्यवहारांची संख्या आणि रक्कम या दोन्ही बाबतीत पेटीएमसाठी खूप मोठा आहे. पेटीएम क्यूआरचा स्वीकार आऊटलेट्सद्वारा प्रचंड प्रमाणात झालेला आहे, ज्यात झटपट सेवा रेस्टोरंटपासून ते सुंदर डायनिंग आणि नित्याचे डायनिंग अशा सर्वच पर्यायांचा समावेश आहे. या सहयोगामुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी सुलभ मोबाइल पेमेंट सक्षम करण्याच्या पेटीएमच्या मोहिमेस आणखी बळकटी येईल.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com