इस्त्राईलचे राजदूत डॅनिअल कार्मन यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

कृषी, गृह, नगरविकास विभागांच्या विविध प्रकल्पांवर चर्चा



मुंबई, दि. 22 :  इस्त्राईलने मोशाव पद्धतीची शेती करीत शेती व शेतीपूरक उद्योगांमध्ये विविध प्रयोग केले आहेत. या सर्व शेती प्रयोगांना जीटूजी (गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट) धर्तीवर राबविण्याचा विचार केला जाईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इस्त्राईलचे राजदूत डॅनिअल कार्मन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी इस्त्राईलचे कॉन्सुल जनरल डेव्हिड अकॉव यांच्यासह राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमारगृह विभागाचे (अपील व सुरक्षा) प्रधान सचिव श्रीकांत सिं‍ह आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते. या भेटीत शिष्टमंडळाने कृषीगृह आणि नगरविकास विभागाच्या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा केली.
इस्त्राईलच्या मोशाव पद्धतीच्या शेतीचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल या दृष्टीने प्रयत्न करतानाच शेतीसह शेतीपूरक उद्योगपशुसंवर्धन आणि इतर विभागांनाही याचा काय फायदा होईल हे तपासले जाईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नागपूर तुरुंगात सुरक्षेच्या अत्याधुनिक उपाययोजना करण्यासाठी इस्त्राईलचे तंत्रज्ञान वापरण्याचाही विचार व्यक्त केला.
अत्याधुनिक पद्धतीचे तुरुंग तयार करताना सुरक्षा आणि अत्याधुनिक यंत्रणा यावर विशेष भर दिला जाईल. इस्त्राईलने यासंदर्भात अहवाल सादर केला आहे. अमृत योजनेअंतर्गत पाणीसोलर एनर्जी यासंदर्भातही  इस्त्राईल शासन अहवाल देणार असून नगरपालिकांना नवीन तंत्रज्ञानप्रयोग कळावेत यासाठी इस्त्राईल महाराष्ट्रास सहाय्य करण्यास उत्सुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राजदूत डॅनिअल कार्मन म्हणाले कीएप्रिल २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्त्राईलला भेट दिल्यानंतर महाराष्ट्र-इस्त्राईलमधील संबंध अधिकच दृढ झाले आहेत. कृषीगृह आणि नगरविकास विभागाचे प्रकल्प जी टू जी धर्तीवर कसे राबविले जातील याबाबत चर्चा सुरु आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सुद्धा लवकरच इस्त्राईलच्या पंतप्रधानांना भेटणार असून त्यामुळे भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ आणि मैत्रीपूर्ण होण्यास मदत होणार असल्याचेही डॅनिअल कार्मन यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

...