रमजान ईद; शहरात 1200 कर्मचार्‍यांचा चोख बंदोबस्त


सोलापूर : प्रतिनिधी
सोमवारी साजर्‍या होणार्‍या रमजान सणासाठी शहरात जवळपास 1200 कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस  आयुक्‍त महादेव तांबडेे  यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस उपायुक्‍त, 4  सहायक  पोलिस आयुक्‍त, 17 पोलिस निरीक्षक, 65 पोलिस उपनिरीक्षक, 1200 पोलिस कर्मचारी, 500 होमगार्ड, राज्य राखीव दलाची एक कंपनी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सोलापूर शहरात पाच ठिकाणी मुस्लिमबांधवांकडून सार्वजनिक नमाज पठण करण्यात येते. होटगी रोडवरील आलमगीर ईदगाह, रंगभवन चौकातील अहिले हदीस ईदगाह, जुनी मिल कंम्पौडमधील ईदगाह, पानगल हायस्कूल ईदगाह आणि आसार मैदान येथील  ईदगाह  मैदानावर मुस्लिमबांधव मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नमाज पठण करतात. या ईदगाह  मैदानावर नमाज पठणाची सर्व तयारी पूर्ण झाली असून शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखा, शहर गुन्हे शाखा, विशेष  शाखा आणि पोलिस  ठाण्यांकडूनही  स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरातील  मोठमोठ्या 13 मशिदींजवळी नमाज पठणाच्यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात 33 ठिकाणी सशस्त्र फिक्स पाँईट लावण्यात आलेले आहेत. त्याशिवाय खरेदीसाठी भरविण्यात आलेल्या मीना बाजार, बेगम बाजार, नई  जिंदगीमधील अमिना बाजार आदी ठिकाणीही पोलिसांकडून स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
ईद मिलनसाठी (बाशी खुत्बा) शहर पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त

रमजान ईद झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मुस्लिमबांधवांकडून ईद मिलन (बाशी खुत्बा) साजरा करण्यात येतो. त्यामुळे शहरातील किल्ला उद्यान, विजापूर रोडवरील प्राणीसंग्रहालय, शहरातील इतर उद्याने, चित्रपटगृहांमध्ये मुस्लिमबांधवांची मोठी गर्दी होते. या सर्व ठिकाणी बाशी खुदब्यादिवशी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111