उघड्यावरील जनतेला होणार उबदार कपड्यांचे वाटप पंढरीतील १० संस्थांचा पुढाकार : आ. परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ
पंढरपूर : पंढरपुर शहर व पंचक्रोशीतील उघड्यावर राहणाऱ्या , गरजू गरीब व्यक्तींचा थंडीपासून बचाव होण्यासाठी त्यांना गरम - उबदार कपड्यांचे वाटप करण्याची भव्य मोहीम शनिवार दिनांक १६ आणि १७ रोजी राबविण्यात येणार आहे.
एक्सेल प्रोफेशनल अकेडमी च्या माध्यमातून पंढरपूर शहरातील दहा संस्था व व्यक्तींकडून हि संकल्पना राबविली जात आहे.
शनिवार दिनांक 16 रोजी सकाळी दहा वाजता शिवाजी चौक येथून आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. शनिवारी आणि रविवारी पंढरपूर शहर व उपनगरातील प्रत्येक घरामध्ये जावून नवीन अथवा वापरात असलेले गरम , उबदार कपडे संकलित करण्याचे काम होईल . प्रत्येक रस्त्यावरून संकलन गाडी फिरणार आहे. नागरिकांनी त्यांना नको असलेले व वापरात नसलेले परंतु स्वच्छ असे उबदार कपडे या गाडीमध्ये जमा करायचे आहेत . त्यांनंतर या कपड्यांचे वर्गीकरण करून शर व परिसरातील गरजू लोकांना याचे वाटप करण्यात येणार आहे. दिनांक १८ ते १९ पर्यंत नदीकाठचा परिसर , उघड्यावर वस्तीला असणारे लोक . झोपडपट्टीतील जनता , वृद्धाश्रम ,बालकाश्रम , रिमांड होम , बालकाश्रम , गरीब विद्यार्थी तसेच उपेक्षित वस्त्यावरील लोकांना या कपड्यांचे वाटप होणार आहे .
शनिवारी कार्यक्रमाच्या दिवशी अथवा संकलन गाडीमध्ये कपडे देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे अथवा कोणत्याही सदस्याला दूरध्वनी करून सोयीच्या ठिकाणी कपडे संकलन करावे आणि गरजूंना मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
संस्थेच्या संकेतस्थळावर ( excel.abgroupindia.in) विशेष लिंक देण्यात आली असून या माध्यमातूनही कपडे इच्छुक दाते संकलित करण्याची सूचना देऊ शकतात . हि सूचना मिळाल्यावर संबंधित ठिकाणी जावून संस्थेच्या वतीने कपडे संकलित केले जातील या उपक्रमात अनिरुद्ध बडवे (पत्रकार) ९२२६३३७६२७ डॉ पारस राका (सदस्य, आई एम ए) ९८२२०६८०५२ , शार्दुल नलबीलवार (सदस्य , क्रेडाई )७५८८२१५१४६, गणेश शिंगण (सदस्य , खादी ग्रामोद्योग )७५८८५९९९९५ संजय झव्हेरी (सहकार मित्र मंडळ )९८२२२८७३७८ , सुनील उंबरे ( सदस्य , पत्रकार संघ ) ९९२११११४०० , सतीश गडम (गडम मामा मित्र मंडळ , स्टेशन रोड)९८२२२७६२६५, हिम्मत आसबे (शुगर मर्चंट असोशिएशन) ९४२०५४३३८० , संतोष भिंगे (मर्चंट ग्रुप) ८३०८६१२३४५, महेश पटवर्धन (अध्यक्ष , वृत्तपत्र विक्रेता संघ )९८९०४८९६२५ , नितीन रत्नपारखी (सदस्य , पंढरपूर एज्युकेशन सोसायटी )९८२२३४८८७५ या संस्था अथवा व्यक्ती सहभागी आहेत .
{ मिडिया प्रायोजक : दैनिक पंढरी संचार