सिग्नल बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने

14-January-2016 


  • मुंबई, दि. १४ -  मंगळवारी हार्बर रेल्वे, बुधवारी मध्य रेल्वे आणि आजपश्चिम रेल्वे मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी रेल्वे सेवा कोलमडत असल्यामुळे कामावर जाणा-या नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. 
    आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकाजवळच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. 
    अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर या बिघाडाचा परिणाम झाला आहे. सकाळी कामावर जायच्यावेळी हे तांत्रिक बिघाड उदभवत असल्यामुळे नियोजित वेळेत कार्यालय गाठताना प्रवाशांचे नाकीनऊ येत आहेत.