सोलापूर:सिध्देश्वर यात्रा... स्टॉल्सची संख्या कमी झाली, शनिवारपासून वाढतेय गर्दी...
सोमवार, 18 जानेवारी 2016
सोलापूर - यात्रेपूर्वीच सुरू झालेल्या देवस्थान समिती व प्रशासनातील वादाचा परिणाम यंदाच्या यात्रेवर स्पष्ट दिसू लागला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा यात्रेत सहभागी झालेल्या स्टॉल्सची संख्या घटली आहे. शनिवारपर्यंत गड्डा यात्रेला जेमतेमच प्रतिसाद होता. शनिवारी व रविवारी गड्ड्यात सहभागी होणार्या नागरिकांची गर्दी वाढली आहे.
यंदाची गड्डा यात्रा भरणार की नाही, यात्रा किती दिवस चालणार, याबाबत कोणतीही गोष्ट स्पष्ट नसल्याने अनेक व्यावसायिक व व्यापारी यंदाच्या यात्रेत सहभागी झाले नाहीत. शिवाय, यात्रेतील मनोरंजनाच्या व करमणुकीच्या तिकीट दरातही वाढ झाली आहे. आपत्कालीन आराखड्यानुसार यात्रेत पोलिस संपर्क केंद्र, रहदारीसाठी मोकळी जागा, अग्निशामक दलाची व्यवस्था यांसह इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांसाठी यात्रेत अनेक सकारात्मक बदल दिसत आहेत.
दरवर्षी यात्रेत साधारणतः 250च्या दरम्यान स्टॉल्स येतात. या वर्षी मात्र 225 स्टॉल्स लावण्यात आले असल्याची माहिती जागावाटप समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोगडे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूने केलेला आपत्कालीन रस्ता सोडून दुकाने थाटण्यात आली आहेत. शिवाय सिद्धेश्वर प्रशालेच्या समोरील मार्ग आपत्कालीन मार्ग म्हणून खुला ठेवल्याने दरवर्षी गजबजलेला दिसणारा हा परिसर या वर्षी मोकळा दिसत आहे.
कृषी प्रदर्शनातून आठ लाखांचे नुकसान
यात्रा प्रत्यक्षात 10 जानेवारीपासून सुरू व्हायला हवी होती. यंदा, मात्र ती 14 जानेवारीपासून सुरू झाली आहे. यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात 100 स्टॉल्स आहेत. परंतु शेतकरी व ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज या प्रदर्शनाची सांगता करण्यात आली. या वर्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याची माहिती देवस्थान पंचसमितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली.
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी स्टॉलची संख्या कमी आहे. होम मैदान रिकामे वाटत आहे. यात्रेतील विक्री होणार्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
- भीमाशंकर कळके
गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादामुळे यात्रा भरण्यास उशीर झाला. यामुळेच स्टॉलची संख्या कमी आहे. मात्र, या वर्षी यात्रेचे उत्तम नियोजन केले आहे. धुळीवरही नियंत्रण मिळविले आहे.
- राघवेंद्र कंटली
या वर्षी धुळीचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. प्रत्येक स्टॉलधारकांनी आपल्या स्टॉलसमोरील जागेत मॅट घातल्यास धुळीचे प्रमाण आणखी कमी होण्यास मदत मिळेल.
- ओंकार होमकर
सोलापूरकरांना या वर्षी गड्डा यात्रेची खूप आतुरतेने वाट पाहावी लागली. मागील वर्षाच्या तुलनेने या वर्षी यात्रा उशिरा सुरू झाली. मनोरंजनाची साधने व इतर वस्तू मागील वर्षीपेक्षा महाग आहेत.
- शोभा शेटे, सोलापूर
भक्तांच्या आरोग्याची घेतली जाते काळजी
होम मैदान व गड्डा यात्रेत भक्तांच्या आरोग्याची काळजी प्रशासन व देवस्थान पंचसमितीने घेतली आहे. यासाठी धूळ उडू नये म्हणून दर दिवशी आवश्यक तेवढ्या वेळा पाणी मारले जाते. तर आरोग्य विभागाकडून तातडीचे सेवा म्हणून ऍम्ब्युलन्स, आवश्यक गोळ्या-औषधे व वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच महानगरपालिकेतर्फे तीन ठिकाणी फिरती स्वच्छतागृहे ठेवली आहेत.