पंढरपूर शहरातील लिंक रोड बाह्य वळण मार्गावर जड व अवजड वाहतुकीस बंदी
सोलापूर दि. 21 : पंढरपूर शहरातील लिंक रोड या बाह्य वळण मार्गावर जड व अवजड वाहनामुळे वाहतुक व्यवस्था विस्कळीत होत असल्याने दिनांक 20 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2016 पर्यंत प्रायोगिक तत्वावर पंढरपूर शहरातील लिंक रोड बाह्य वळण मार्गावरील जड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.
त्यानुसार बाह्यवळण मार्गावरुन सोलापूर–बार्शी नगर बाजूकडून येणारी व पंढरपूरातुन जाणारी वाहने यामध्ये ट्रॉलीसह ट्रेलर कंटेनर, गॅस टँकर ( ट्रॅक्टर ट्रॉलीसह वगळून ) या वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा, वेणगाव फाटा, अहिल्या चौक पंढरपूर याठिकाणाहून जाण्यास बंदी करण्यात आली आहे या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणुन मोहोळ – कामती- मंगळवेढा- सांगोला मार्गे इच्छिस्थळी किंवा मोहोळ, शेटफळ, टेंभूर्णी, वेळापूर, साळमुख फाटा, महुद, सांगोलामार्गे इच्छितस्थळी.
विजापूर- कोल्हापूर- सांगली- सातारा- आटपाडी- पुण्या बाजुकडून नियमितपणे येऊन पंढरपूर मार्गे बाह्य वळण मार्गावरुन टेंभूर्णी, शेटफळ, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला बाजुकडे जाणारी जड अवजड वाहने त्यामध्ये ट्रक, डंपर, ट्रॉलीसह ट्रेलर, कंटेनर, ट्रॅक्टर व गॅस टँकर ( सार्वजनिक वितरण व्यवस्था शासकीय अन्नधान्य वाहतुकीची साधने ) केरोसीन, डिझेल, पेट्रोल, व गॅस सिलेंडरची वाहतुक करणारी वाहने, ट्रॅक्टर ट्रॉलीसह व ऊस वाहतुक करणारी वाहने वगळून) या वाहनांना कुरुल फाटा, मंगळवेढा नाका, सांगोला नाका, महुद फाटा, साळमुख फाटा, श्रीज्ञानेश्वर चौक, वेळापूर येथून पंढरपूरमार्गे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांनी पर्यायी मार्ग म्हणुन कामती- मंगळवेढा, सांगोला, महुद, वेळापूर, अकलुज, टेंभूर्णी मार्गे इच्छित स्थळी किंवा वेळापूर, महुद, सांगोला, मंगळवेढा, कामती, मोहोळ मार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी या मार्गाचा वापर करावा.
या प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आलेल्या वाहतुक व्यवस्थेची संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
000