अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथ विक्रीचा उच्चांक... तीन दिवसात तीन कोटींचा टप्पा ओलांडला...
ज्ञानोबा तुकाराम साहित्य नगरी
सोमवार, 18 जानेवारी 2016 - 12:00
पिंपरी-चिंचवड - नवी पिढी पुस्तक वाचत नाही, असा आरोप सर्रास केला जातो; पण हा आरोप खोटा आहे, हे सांगणारे चित्र गेल्या तीन दिवसांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. तरुणाईची प्रचंड गर्दी येथे झाल्याने तीन कोटी रुपयांपेक्षाही जास्त पुस्तकांची विक्री झाली आहे. ही उलाढाल उद्यापर्यंत (ता. 18) पाच कोटींच्या घरात पोचेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवसापासून येथे ग्रंथ प्रदर्शन सुरू झाले आहे. गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून हे प्रदर्शन दोन भागांत विभागण्यात आले आहे. तरी या दोन्ही ठिकाणी क्षणाक्षणाला गर्दी वाढत होती. इतका प्रतिसाद शनिवारी आणि रविवारी पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी प्रदर्शनाला फारसा प्रतिसाद नव्हता. तरी गेल्या दोन दिवसांत ग्रंथ विक्रीची उलाढाल वाढत गेल्याचे चित्र आहे.
कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या देवयानी अभ्यंकर म्हणाल्या, बाजीराव मस्तानी या चित्रपटामुळे राऊ कादंबरीला प्रचंड मागणी वाढली आहे. वाढत्या प्रतिसादामुळे या पुस्तकाची प्रतच आज संपली. याशिवाय, शिवाजी महाराज, पेशवे यांच्यासंदर्भात इतर ऐतिहासिक विषयांवरील पुस्तकांनाही मागणी आहे. विज्ञान, आरोग्यविषयक आणि छोट्या मुलांच्या पुस्तकांची वाचकांमधून आवर्जून विचारणा होत आहे. खरेदीही होत आहे.
अक्षरधाराचे रमेश राठीवडेकर म्हणाले, शरद पवार यांचे लोक माझे सांगाती, भालचंद्र नेमाडे यांचे हिंदू, श्रीनिवास ठाणेदार यांचे ही श्रींची इच्छा, शांता शेळके यांचे धुळपाटी या पुस्तकांना प्रचंड मागणी आहे. तशीच मागणी चित्रपटांमुळे राऊ, नटसम्राट या पुस्तकांनाही आहे. मृत्युंजय, छावा, युगंधर, पानिपत या पुस्तकांवर तर नेहमीप्रमाणेच वाचकांच्या उड्या पडत आहेत. या वाढत्या मागणीमुळे ही पुस्तके संपली, हे पुस्तक उद्या येईल असे सांगण्याची वेळ आमच्यावर आली आहे. मनोविकासचे अरविंद पाटकर म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून भन्नाट प्रतिसाद आहे. अच्युत गोडबोले, उत्तम कांबळे, अरविंद गुप्ता, बाळ फोंडके, रवी बापट अशा लेखकांची पुस्तके उत्सुकतेने घेतली जात आहेत.
मागणी का वाढतेय?
- वेगवेगळ्या भागांतील, विविध विषयांवरील पुस्तकांचा प्रदर्शनात समावेश
- चित्रपटांमुळे ऐतिहासिक विषयांवरील कांदबर्यांबाबत वाढती उत्सुकता
- आरोग्याबाबत जनजागृती वाढल्याने या विषयावरील पुस्तकांना प्रतिसाद
... अन् नाराजी झाली दूर
घुमानमध्ये मराठी लोक नाहीत. त्यामुळे तेथे संमेलन भरवू नका. तेथे पुस्तकांची विक्रीही होणार नाही, असे प्रकाशकांनी साहित्य महामंडळाला मागील वर्षी सांगितले होते. तरी महामंडळाने तेथे संमेलन घेतले. ते अजूनही चर्चेत आहे; पण प्रकाशक नाराज होते. मात्र पिंपरी-चिंचवडमधील संमेलनात वाचकांचा ग्रंथ प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आणि उलाढालही वाढत असल्याने ही नाराजी दूर झाल्याची चर्चा प्रकाशकांमध्ये रंगत आहे