सोलापूर जिल्ह्यातील तीन अभियांत्रिकी महाविद्यालये पुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात खुलासा देणार
सोमवार, 18 जानेवारी 2016
सोलापूर - तंत्र शिक्षण विभागीय पुणे कार्यालयामार्फत सर्व पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली होती. यात जिल्ह्यातील तीन महाविद्यालयांसह पुणे विभागातील 27 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. याबाबतचा खुलासा करण्याची मागणी तंत्रशिक्षण विभागाने केली आहे. यास अनुसरून जिल्ह्यातील तीन महाविद्यालये सोमवारी (ता. 18) पुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात खुलासा देणार आहेत.
एआयसीटीई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) यांनी ठरविलेल्या निकषानुसार या महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली होती. महाविद्यालयांबाबत येणार्या तक्रारींनुसार त्रुटी असलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर तंत्रशिक्षण विभागाने या महाविद्यालयांची पाहणी केली. पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील 27 महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यात भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (वैराग, बार्शी), श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटर (पानीव, माळशिरस) ही त्रुटी असलेली महाविद्यालये आहेत. त्रुटी असलेल्या महाविद्यालयांना दिलेल्या वेळेत त्रुटीच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे व खुलाशासह पुणे येथील तंत्र शिक्षण कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे. ज्या संस्था सुनावणीस उपस्थित राहणार नाहीत अशा संस्थांवरील कार्यवाही वरिष्ठ कार्यालय येथे प्रस्तावित करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे यांच्याकडून त्रुटी असलेल्या महाविद्यालयांना पाठविण्यात आले आहे.
बाजू मांडणार
सोलापूर जिल्ह्यातील तीन महाविद्यालयांशी संपर्क साधला असता भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संस्थेचे अध्यक्ष डी. एस. गायकवाड, वैराग येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एम. डी. पाटील, पानीव येथील श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरचे प्राचार्य डॉ. पी. के. देशमुख यांनी तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाने ज्या त्रुटी दर्शविल्या होत्या त्या पूर्ण केल्या असून, आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालये आपली बाजू मांडणार असल्याचे सांगितले.