हो तो हल्ला माझ्यावरच झाला होता.... मला कोणत्याही सुरक्षेची आवश्यकता भासत नाही.... पंढरपूर लाईव्ह शी बोलताना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आपले मत
पंढरपूर लाईव्ह वृत्त : शुक्रवार दि.15 जानेवारी 2016
काय म्हणाले जिल्हाधिकारी... बघा खालील व्हिडीओ
पालखी तळ व पालखी मार्गाच्या विस्तारीकरणाबाबत पुणे, सोलापूर व सातारा या 3 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांचेसोबत आज पुणे जिल्हा विभागीय आयुक्त श्री.चोक्कलिंगम यांची व्हिडीओ कॉन्फरन्स् पार पडली. सोलापूर जिल्ह्यातील ही व्हिडीओ कॉन्फरन्स् पंढरपूर तहसिल कार्यालय येथे आज पार पडली. या कॉम्फरन्स् साठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांचेसह उपस्थित होते. या कॉन्फरन्स् साठी जिल्हाधिकार्यांसोबत न.प. मुख्याधिकारी, तहसिलदार, व मंदिर समितीचे श्री.कादबाने आदींसह सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या पत्रकारांशी सुसंवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
पालखी मार्गाचे व पालखी तळाचे विस्तारीकरणाबाबत सर्वांना विश्वासात घेतले जाईल तसेच येथील शेतकर्यांचे म्हणणे ऐकुन घेणार. बडवे उत्पात आपल्या अधिकारासंदर्भात हायकोर्टात गेले आहेत याबद्दल त्यांचे मत विचारले असता मंदिराबाबत सुप्रिम कोर्टात निर्णय झालेला आहे त्यामुळे कोण कुठे गेले याबाबत मला चिंता नाही असे ते म्हणाले.
पंढरपूर-पुणे मार्गावरुन मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड भरलेले वाळुचे टिपर जात असतात याबाबत विचारले जिल्ह्यात यासाठी आवश्यक तेथे चेकपोष्ट उभे करुन हे प्रकार थांबवु असे ते म्हणाले.
पंढरपूरमधील कांही रस्त्यांच्या रुंदीकरणासाठीचा 52 कोटींचा निधी खर्च होणार का? या रस्त्यांची कामे होणार का? की हा निधी खर्चावाचून परत जाणार? याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, जर व नगरपालिकेने रस्ते रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेतली तर ही कामे होणे शक्य आहे. नगरपालिकेने त्वरीत ही जागा ताब्यात घ्यावी अन्यथा 52 कोटी चा निधी माघारी जाईल. सिध्देश्वर यात्रे च्या संदर्भात विचारले असता यावर ‘नो कमेंटस्’ असे म्हणत या यात्रेची मी माझी सर्व जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली असल्याचे ते म्हणाले.
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी व गजेंद्र मंडप या ठिकाणचे छताचे जुने बांधकाम धोक्याचे असल्याने उतरविण्यात आलेले आहे. या ठिकाणी ‘पॉलिकॉन’ चा वापर करुन हा भाग सुशोभित करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
13 जानेवारी 2016 रोजी माढा तालुक्यातील लऊळ येथे वाळु माफियांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर हल्ला केला होता. हा हल्ला खरंच जिल्हाधिकारी यांचेवर झाला की नाही याबाबत 13 तारखेला सामान्य जनतेसोबत कांही पत्रकार सुध्दा संभ्रमीत अवस्थेत होते. पंढरपूर लाईव्ह ने याबाबत चौकशी करुन जिल्हाधिकारी यांचेवर हल्ला झाल्याचे वृत्त प्रसिध्द केले होते. मात्र यासंदर्भात अधिक माहितीसाठी कुर्डूवाडी पोलिस स्टेशनशी संपर्क साधला असता हा हल्ला जिल्हाधिकारी यांचेवर नव्हे तर मंडल अधिकार्यांवर झाला अशी माहिती पंढरपूर लाईव्ह ला मिळाल्यानंतर हे वृत्त काढून जिल्हाधिकार्यांवरील हल्ल्याचे वृत्त चुकीचे ही बातमी पंढरपूर लाईव्ह वर प्रसिध्द करण्यात आली होती. यासंदर्भात प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांना विचारले असता त्यांनी हा हल्ला आपल्यावरच झाल्याचे आज स्पष्ट केले आहे.
livenewsmaharashtra@gmail.com
‘‘हो तो हल्ला माझ्यावरच झाला होता. विश्वास नसेल तर घटनास्थळावर जाऊन चौकशी करा.’’ असे सांगत सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचे आज स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर आपल्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे का? पंढरपूर लाईव्ह ने विचारलेल्या या प्रश्नावर ते म्हणाले की, मला कोणत्याही सुरक्षेची आवश्यकता भासत नाही. वाळु माफियांवर कारवाई करण्यास गेलेले इतर अधिकारी व कर्मचारी यांचे सुरक्षेबाबत त्यांनी सांगितले की, कारवाई करण्यासाठी पॉईंट वर जाताना स्थानिक पोलिस अधिकारी यांचे सह सुरक्षा घेऊनच अधिकार्यांकडून कारवाई केली जाते.
www.pandharpurlive.comकाय म्हणाले जिल्हाधिकारी... बघा खालील व्हिडीओ
पालखी तळ व पालखी मार्गाच्या विस्तारीकरणाबाबत पुणे, सोलापूर व सातारा या 3 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांचेसोबत आज पुणे जिल्हा विभागीय आयुक्त श्री.चोक्कलिंगम यांची व्हिडीओ कॉन्फरन्स् पार पडली. सोलापूर जिल्ह्यातील ही व्हिडीओ कॉन्फरन्स् पंढरपूर तहसिल कार्यालय येथे आज पार पडली. या कॉम्फरन्स् साठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांचेसह उपस्थित होते. या कॉन्फरन्स् साठी जिल्हाधिकार्यांसोबत न.प. मुख्याधिकारी, तहसिलदार, व मंदिर समितीचे श्री.कादबाने आदींसह सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या पत्रकारांशी सुसंवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
पालखी मार्गाचे व पालखी तळाचे विस्तारीकरणाबाबत सर्वांना विश्वासात घेतले जाईल तसेच येथील शेतकर्यांचे म्हणणे ऐकुन घेणार. बडवे उत्पात आपल्या अधिकारासंदर्भात हायकोर्टात गेले आहेत याबद्दल त्यांचे मत विचारले असता मंदिराबाबत सुप्रिम कोर्टात निर्णय झालेला आहे त्यामुळे कोण कुठे गेले याबाबत मला चिंता नाही असे ते म्हणाले.
पंढरपूर-पुणे मार्गावरुन मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड भरलेले वाळुचे टिपर जात असतात याबाबत विचारले जिल्ह्यात यासाठी आवश्यक तेथे चेकपोष्ट उभे करुन हे प्रकार थांबवु असे ते म्हणाले.
पंढरपूरमधील कांही रस्त्यांच्या रुंदीकरणासाठीचा 52 कोटींचा निधी खर्च होणार का? या रस्त्यांची कामे होणार का? की हा निधी खर्चावाचून परत जाणार? याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, जर व नगरपालिकेने रस्ते रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेतली तर ही कामे होणे शक्य आहे. नगरपालिकेने त्वरीत ही जागा ताब्यात घ्यावी अन्यथा 52 कोटी चा निधी माघारी जाईल. सिध्देश्वर यात्रे च्या संदर्भात विचारले असता यावर ‘नो कमेंटस्’ असे म्हणत या यात्रेची मी माझी सर्व जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली असल्याचे ते म्हणाले.
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी व गजेंद्र मंडप या ठिकाणचे छताचे जुने बांधकाम धोक्याचे असल्याने उतरविण्यात आलेले आहे. या ठिकाणी ‘पॉलिकॉन’ चा वापर करुन हा भाग सुशोभित करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
13 जानेवारी 2016 रोजी माढा तालुक्यातील लऊळ येथे वाळु माफियांनी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर हल्ला केला होता. हा हल्ला खरंच जिल्हाधिकारी यांचेवर झाला की नाही याबाबत 13 तारखेला सामान्य जनतेसोबत कांही पत्रकार सुध्दा संभ्रमीत अवस्थेत होते. पंढरपूर लाईव्ह ने याबाबत चौकशी करुन जिल्हाधिकारी यांचेवर हल्ला झाल्याचे वृत्त प्रसिध्द केले होते. मात्र यासंदर्भात अधिक माहितीसाठी कुर्डूवाडी पोलिस स्टेशनशी संपर्क साधला असता हा हल्ला जिल्हाधिकारी यांचेवर नव्हे तर मंडल अधिकार्यांवर झाला अशी माहिती पंढरपूर लाईव्ह ला मिळाल्यानंतर हे वृत्त काढून जिल्हाधिकार्यांवरील हल्ल्याचे वृत्त चुकीचे ही बातमी पंढरपूर लाईव्ह वर प्रसिध्द करण्यात आली होती. यासंदर्भात प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांना विचारले असता त्यांनी हा हल्ला आपल्यावरच झाल्याचे आज स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र न्युज चे वाचक संपुर्ण महाराष्ट्रासह जगातील कानाकोपर्यातील मराठी माणसे मोठ्या संख्येने झालेले आहेत. अल्पकाळात हे ई-न्युज वेब पोर्टल यशस्वी केल्याबद्दल तमाम मराठी माणसांचे धन्यवाद..!
महाराष्ट्र Live Newsमध्ये आपापल्या भागातील ताज्या सत्य बातम्या अथवा आपल्या भागातील सामाजिक समस्या आम्हाला खालील ई-मेल आयडी वर मेल करा.
योग्य त्या मजकुरास ठळक प्रसिध्दी दिली जाईल
-संपादकीय विभाग
अधिक माहितीसाठी
आमचा व्हाटस अप क्र. आहे 8552823399
गुगल प्ले स्टोअर वरुन महाराष्ट्र चे अॅन्ड्रॉईड अॅप्स
आपल्या मोबाईलमध्ये अवश्य घ्या.
livenewsmaharashtra@gmail.com