शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व उपाय योजना करण्यासाठी छावा संघटनचे प्रांताधिकारी यांना निवेदन

शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व उपाय योजना करण्यासाठी छावा संघटनचे प्रांताधिकारी यांना निवेदन
पंढरपूर । प्रतिनिधी,
पंढरपूर शहरामधील असणार्‍या पेट्रोल व डिझेल पंपामध्ये आग प्रतिबंधक व्यवस्था तसेच आपत्ती व्यवस्थापनेचा अभाव असल्याने  काही महिन्यांपूर्वी बोहरी पंपामध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे त्या परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यासाठी पंढरपूरचे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांत साहेब यांना अ.भा.छावा मराठा युवा संघटनच्यावतीने खालील मागण्यांचे निवेदन सोमवार दि.25 जानेवारी रोजी देण्यात आले. तसेच खालील मागण्यांचा विचार न झाल्यास अ.भा.छावा मराठा युवा संघटनच्यावतीने रस्त्यावर उतरून तीव‘ आंदोलन करण्यात येईल असा इशारा पंढरपूर शहर संघटक सागर चव्हाण यांनी दिला.
निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील कुठल्याही पेट्रोल पंपामध्ये अग्नि प्रतिरोधक यंत्रणा, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, ग‘ाहकांकरिता मोङ्गत हवा भरण्याचे साधन, तक‘ार पेटी, गाड्यांना पार्किंगची सोय व पंढरपूर शहरामधील एक तरी पेट्रोल पंप नागरिकांसाठी किंवा परगावाहून येणार्‍या भाविकांसाठी 24 तास खुला असावा यापैकी कुठल्याही व्यवस्था अस्तित्वात नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे  उपविभागीय अधिकार्‍यांनी वरील सुविधा शहरातील पेट्रोल पंपावर देण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देताना अ.भा.छावा संघटनेचे जि.अध्यक्ष संतोष भोसले, वि.आ.जि.अध्यक्ष विकी झेंड,  युवक काँग‘ेसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे, धनराज लटके, सोपान काका देशमुख, विशाल यादव, संतोष खिलारे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.