उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न
पंढरपूर दि. 25 :- उपविभागीय दक्षता व संनियंत्रण
समितीची बैठक उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय
कार्यालय, पंढरपूर येथे संपन्न झाली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश
जाधव, तहसिलदार नागेश पाटील, गटविकास
अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाचे श्री. देशपांडे यांच्यासह
समितीचे अशासकीय सदस्य औदुंबर मेटकरी, संतोष नेहतराव, धनाजी शिवपालक, श्रीमंत मस्के उपस्थित होते.
बैठकीत अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतीबंधक अधिनियमाच्या
अंमलबजावणी बाबत व अत्याचारीत प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. सुधारीत ॲट्रासिटी
कायदा अधिनियम 2015 चे प्रसिद्धी बाबत महसुल, पोलीस आणि पंचायत समिती मार्फत
मेळावे घेण्यात यावेत व केंद्र सरकारने याबाबत 10 जानेवारी 2016 रेाजी केलेल्या
कायद्याचीही प्रसिद्धी करावी अशा सूचना उपविभागीय अधिकारी श्री. तेली यांनी या
बैठकीत दिल्या.