सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सत्ताधारी शिवसेना – भाजपने गाजवल्यानंतर, आज काँग्रेस – राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे.
काँग्रेसने सरकारविरोधी दीक्षाभूमी ते विधानसभा असा मोर्चा काढला. तर राष्ट्रवादी आमदारही रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीशिवाय सभागृह चालू देणार नाही, असा इशारा दिला.
सरकारविरोधात वेगवेगळे आलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोर्चे मग एकत्र आले आणि परिसर दणाणून सोडला. दोन्ही पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधी फलकबाजी करत सभागृहात घुसले. त्यामुळे सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं.
दरम्यान कालच महाधिवक्ते श्रीहरी अणे यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या वक्तव्यावरून शिवसेनेने संयुक्त महाराष्ट्राची घोषणाबाजी केली. तसंच अणे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर त्याचवेळी भाजप आमदारांनी जय विदर्भचा नारा दिला होता.

त्यामुळे वेगळ्या विदर्भावरुन घोषणाबाजींचं सत्र झाल्यानंतर आज अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर काँग्रेसच्या महिला आमदारांनीही आक्रमक पवित्रा घेतला. आमदार प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, अमिता चव्हाण यांनी थेट वेलमध्ये धाव घेत, शेतकरी कर्जमाफीची मागणी केली