करकंब आणि परिसरातून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु

करकंब:-  पंढरपुर चे तहसिलदार गजानन गुरव यांनी मागील अठवडयामध्ये पंढरपुर तालुक्यातील वाखरी येथील अवैध वाळू उपसा व वाहतूक यावर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे व प्रांताधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली करवाई केली होती.
    करकंब परिसरामधुन मात्र दिवसा व रात्री  अनेक ट्रक,टिपर,ट्रॅक्टर मधुन ओव्हर लोड वाहतूक सुरु असते.परंतु त्याच्यावर कोणत्याच प्रकारची करवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमधून अवैध वाळू वाहतूक बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
  याकडे पोलिस प्रशासन व महसुल प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे.