आ.भाई राऊळ -एक झंझावात! 99 व्या जयंतीनिमित्त वंदनीय भाईंना विनम्र अभिवादन!
पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट लाईव्ह न्युज (प्रासंगीक)
दि.18/12/2015
भाई राऊळ यांची ९९ वी जयंती साजरी होत आहे, भाईंचा जन्म १८ डिसेंबर १९१६ साली पंढरपुर जवळच्या तावशी गावात राऊळ कुटुंबात झाला. भाई राऊळ हे हरहुन्नरी माणुस, गळा पहाडी आवाजाचा, नकला तर बेफामच, अंगात नाना कळा, त्यांचं शालेय शिक्षण पंढरपुरातच झालं, त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने कामगार संघटना व गरीब लोकांच्या संघटनाबांधण्यास सुरुवात केली. पंढरपूर तालुक्यातील तावशी हे भाईंचं गाव.18 डिसेंबर 1916 रोजी राऊळ समाजातजन्म,ना घर ना जमीन,ना पैसा अडका,उपजिविकेसाठी पडम,सुताडे विणायचे आणि पंढरपूरच्या रस्त्यावर विकायचे,दुष्काळ ात प्रपंच्याची वाताहत,सांगोला- मुंबईला नशीब आजमाऊन परत पंढरपुरात.तळा-गाळातील शेतकरी-शेतमजूर, कामगार आणि सामान्य जनतेच्याप्रश्नांची उत्तम जाण,उत्तम अभ्यास आणि धारधार वक्तृत्व,समर्पित जीवन.सर्वांना आपला वाटणारा कार्यकर्ता- नेता आमदार भाई राऊळ!
विधानसभेच्या अवघ्या 13 महिन्याच्या कामकाजात विधानसभा गाजवली.सारा महाराष्ट्र गाजवला.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना प्रतापगडावर काळे झेंडे दाखवत मोर्चा घेऊन भाई राऊळ गेले.तेव्हा समितीचे नेते एस.एम.जोशी यांनी त्यांना शाबासकी दिली.कडलास येथील शेतकरी परिषदेला साने गुरुजींना आणले.राष्ट्र सेवा दलाशी त्यांचा संबंध राहिला.गोवा मुक्ती लढ्यामध्ये गावचे 33 साथी (सैनिक) घेऊन गेले.
सोलापूर जिल्यातील दुष्काळी परिस्थिती विधानसभेत मांडली.उपाय सुचवले.आणखी खूप खूप काही हे पुस्तक वाचलेनंतर हा माणूस काय होता हे समजेल.असा कार्यकर्ता-पुढारी-नेता आमदार
भाई राऊळ अकाली गेले !
मोठी पोकळी निर्माण झाली. आजच्या राजकारणातून काय अपेक्षा बाळगावी ? सहज ओठावर येते.......
भाई राऊळ ! घे जन्म तू फिरुनी !!
मुंबईस विधानसभेच्या अधिवेशनास जात असतांना कर्जतला रेल्वेमध्ये ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने दि.14 एप्रिल 1958 रोजी निधन.
काळोखात आकाशात वीज चमकावी आणि काळोख अधिकच गडद व्हावं !
अशीच पंढरपूर तालुक्याची अवस्था झाली.आपल्या घरातलाच माणूस गेल्याचं दु:ख सामान्य जनतेला झालं.
महाराष्ट्राचं स्वप्न साकार होण्याच्या काळातच भल्या पाहटे तांबडफुटताना नियतीने त्यांना ओढून नेलं हे सर्वांचं दुर्भाग्य !
उष:काल होता होता ! काळरात्र झाली !
वंदनीय भाईंना आणि त्यांच्या चिरंतन स्मृतीस त्यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
साभार- भाई राऊळ -एक झंझावात (विधानसभेतील भाषणाचा संग्रह)
प्रकाशक :- पांडूरंग नाना राऊळ.
भाई राऊळ गौरव समिती,पंढरपूर

