हेडलाईन्स 26 डिसेंबर
हेडलाईन्स
महाबळेश्वर : केळघर घाटातून टँकर दरीत कोसळला, अपघातामुळे महाबळेश्वर-मेढा वाहतूक विस्कळीत
—————-
नागपूर विमानतळावरुन तीन तरुण ताब्यात, आयसिसच्या संपर्कात असल्याचा संशय, तिन्ही तरुण हैदराबादचे
————
खंडाळा इथे टेम्पोने अचानक पेट घेतला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक पुन्हा खोळंबली, पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने
—————–
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मास्टरस्ट्रोक, पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफांची भेट, दोन्ही नेत्यांची दीड तास सोबत
2. मोदी-शरीफ भेटीमुळे हाफिज सईदला मिर्ची झोंबली, देशाच्या दुश्मनाचं स्वागत केल्यानं काश्मिरी जनता दुखावल्याचं वक्तव्य
2. मोदी-शरीफ भेटीमुळे हाफिज सईदला मिर्ची झोंबली, देशाच्या दुश्मनाचं स्वागत केल्यानं काश्मिरी जनता दुखावल्याचं वक्तव्य
3. मोदी-शरीफ यांची भेट पूर्वनियोजित, काँग्रेसचा आरोप, तर भेट ऐनवेळी ठरल्याचं पाकिस्तानचं स्पष्टीकरण
4. यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी, अफगाणिस्तानच्या संसदेत मोदीकंडून जंजिरचा डॉयलॉग, पाकिस्तानला चिमटे
5. मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेच्या पोकळीत 6 वर्षीय मुलाचा हाडाचा सापळा, वडाळ्यातून मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती, हत्या करुन मृतदेह लपवला
6. ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांच्यावर आज सांताक्रूजमध्ये अंत्यसंस्कार, दीर्घ आजाराने शुक्रवारी राहत्या घरी निधन
7. मॉस्को,दिल्लीपेक्षाही निफाड, महाबळेश्वरचं तापमान खालावलं, नाशिकचा पारा ५.६ सेल्सिअसवर, येत्या दिवसातही थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज
8. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर कोकणचा राजा बाजारात, 3 महिने आधीच हापूस आंबा खवय्येगिऱ्यांसाठी उपलब्ध, आंब्याच्या पेटीसाठी मोठी किंमत मोजावा लागणार------------