पंढरपुरात वीरमर्द कै.अनिल डोंबे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम.... जंगी कुस्त्यांचे मैदान...वीरशैव लिंगायत समाज वधु-वर-पालक परिचय मेळावा... मोफत सर्वरोग निदान शिबीर.... 23 रे 25 डिसेंबर पर्यंत भरगच्च समाजोपयोगी कार्यक्रम- नंदकुमार डोंबे यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती

पंढरपूर लाईव्ह वृत्त  दि.18-12-2015


पंढरपूर (प्रतिनिधी)- वीरमर्द कै.अनिल डोंबे यांच्या 34 व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार दि.23 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत जंगी कुस्त्यांचे मैदान, मोफत सर्व रोग निदान शिबीर, वीरशैव लिंगायत समाज वधु-वर पालक परिचय मेळावा आदिंसह पंढरपूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती समाजभुषण नंदकुमार आप्पा डोंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


येथे होणार्‍या कुस्ती स्पर्धांना खुप जुनी परंपरा -नंदकुमार डोंबे

        जंगी कुस्त्यांचे मैदान दि.23 डिसेंबर रोजी दु.2 वाजता टिळक स्मारक मंदिर पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी कुस्ती प्रमुख पै.रावसाहेब मगर (मोठे),पै.राजाभाऊ रसाळ, पै.अरूण कंडरे, पै.अफसर शेख, पै.भिमा माळी व पंच म्हणून पै.रामभाऊ औसेकर, पै.बाळू चवरे, पै.सोमनाथ सुर्वे, पै.मारूती माळी, पै.रावसाहेब मगर (छोटे), पै.दत्ता कोळेकर, पै.गोपाळ चव्हाण काम पाहणार आहेत. या कुस्तीस्पर्धेचे वैशिष्ट्ये असे की येथे जुने जाणते पंचमंडळी असणार आहेत. आमच्या कुस्ती स्पर्धांची परंपरा खुप जुनी असून या ठिकाणी होणारी कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडली जात नाही. अशी माहिती यावेळी नंदकुमार डोंबे यांनी दिली.


            मोफत सर्व रोग निदान शिबीरामध्ये मोतीबिंदू तपासणी, कॅलशिअम डिटेक्शन (मशीनद्वारे) हाडाची ठिसूळता तपासणी व मॉईश्‍वर डिटेक्शन मशीनद्वारे त्वचेची तपासणी या शिबीरात करण्यात येणार आहे. सदरचे शिबीर दि.23 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत डॉ.सोनवणे हॉस्पिटल भोसले चौक पंढरपूर येथे आयोजन करण्यात आलेले आहे.

         दि.24 रोजी रक्तदान शिबीर दु.3 ते 6 श्री मन्मथ स्वामी मठ संस्था येथे आहे. तसेच अनाथ आश्रमात, अंध अपंगांना खाऊ वाटप व गरीबांना चादर वाटप आदि सामाजिक
कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

        वधु-वर-पालक मेळावा- वधु-वरांचे रक्तगट मोफत तपासणी होणार

                    वीरशैव समाजातील वधु-वर विवाह जुळविण्यासाठी करावी लागणारी पायपीट, त्रासदायक प्रवास व आर्थिक अडचणीतून येणारा खर्च आणि या सर्व अडचणीतून काढावा लागणारा वेळ हे फार कठीण झाले आहे. यातून समाजाला थोडासा दिलासा देण्याच्या काम समाजभुषण नंदकुमार आप्पा डोंबे यांनी केले आहे. या मेळाव्याला प्रवेश फी व नाव नोंदणी फी विनामूल्य आहे. शुक्रवार दि.25 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 4 पर्यंत शेठ मोरारजी कानजी धर्मशाळा स्टेशन रोड पंढरपूर येथे आयोजित केला आहे.
                 वधु-वर मेळाव्या निमित्त आलेल्या सर्व वधु-वरांचे रक्तगट या ठिकाणी मोफत तपासण्यात येणार असून महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे रक्तगटांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ.मेणकुदळे यांनी दिली.
वधु-वर -पालक मेळाव्यासाठी येताना आपल्या स्थळाच संपुर्ण बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, जन्म पत्रिका आदी कागदपत्रे सोबत आणावीत.
नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क. सागर स्वामी (9665273870), अक्षय मेणकुदळे (7387743050), गिरीस हत्तीगोटे (9767292380), चंदुकाका आर्वे (9970738645), ज्ञानेश्‍वर सुकरे (9881361286), सुरज पावले (8087955509), शिरीष पांडुरंग पंतोजी पाटील (9921870909) 

             या पत्रकार परिषदेस समाजभुषण नंदकुमार आप्पा डोंबे, ट्रस्ट अध्यक्ष श्री मन्मथ स्वामी मठ संस्था नवी पेठ पंढरपूर शिरीष पांडुरंग पंतोजी पाटील, अध्यक्ष वीरशैव लिंगायत समाज, उपाध्यक्ष संजय सुभाष खटावकर, सुरज सुरेश पावले, अक्षय मेणकुदळे, सुेज सुरेश पावले, ज्ञानेश्‍वर सुकरे व डॉ.मेणकुदळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.