कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरीत येणार्‍या भाविकांच्या स्वागतास पंढरी सुसज्ज.... वारीच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे , सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक विरेश प्रभु व इतर प्रशासकीय अधिकार्‍यांनी केलेले नियोजनासंदर्भातील वार्ता...

पंढरपूर लाईव्ह दि.19 नोव्हेंबर 2015

65 एकर, वाळवंट व पत्राशेड परिसराचीजिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडून पाहणी

      ­­



      पंढरपूर दि. 19 :-   कार्तिक वारीसाठी येणाऱ्या भाविकांची 65 एकर येथे  राहण्याची सुविधा करण्यात आली असून या सुविधेची, तेथील सुरु असलेल्या कामांची, वाळवंट, पत्राशेड परिसराची जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पाहणी केली.
            यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, प्रांताधिकारी संजय तेली, नगरपालिका प्रशासन अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रतिनिधी श्रीमती प्रियंका कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, मुख्याधिकारी शंकर गोरे, शहर पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी मुंढे यांनी 65 एकर परिसरात सुरु असलेल्या कामांची पाहणी करुन त्याबाबत सर्व सबंतित अधिका-यांना सूचना दिल्या. तद्नंतर त्यांनी वाळवंट व नदीपात्राची पाहणी केली. वाळवंट  आणि नदीपात्रात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.  महाद्वार रस्ता हा भाविकांसाठी खुला रहावा. या रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, जे दुकानदार अशी अतिक्रमणे  करतील ती नगरपालिकेने तात्काळ काढावीत अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
            वाळवंट, 65 एकर, पत्राशेड या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मदत कक्षातील  अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी.  मा.  उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
                                  00000
जिल्हाधिका-यांच्या हस्ते पॉलिथीन पिशव्यांचे वाटप
            पंढरपूर दि. 19 :-  65 एकर येथे राहणाऱ्या वारकरी-भाविकांनी हा परिसराची स्वच्छता  राखण्यासाठी सहकार्य करावे, कचरा, शिळे अन्न उघड्यावर न टाकता प्रशासनामार्फत पुरविण्यात आलेल्या पिशव्यांमध्ये टाकावे असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी  केले.
            कचरा, शिळे अन्न  टाकण्यासाठी वारक-यांना पॉलीथिन  पिशव्याचे वाटप जिल्हाधिकारी मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, प्रांताधिकारी संजय तेली, नगरपालिका प्रशासन अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रतिनिधी श्रीमती प्रियंका कुलकर्णी, मुख्याधिकारी शंकर गोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, शहर पोलीस निरीक्षक किशोर नावंदे उपस्थित होते.
00000
  कार्तिक वारीत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोख पाडावी -         जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे
 
            पंढरपूर दि. 19 :-   कार्तिक वारीत अधिकारी-कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोख पार पाडून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाळवंट व नदीपात्र स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिल्या.
            जिल्हा प्रशासनामार्फत अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी उपविभागीय कार्यालय, पंढरपूर येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित केली असून या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.  यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, प्रांताधिकारी संजय तेली, नगरपालिका प्रशासन अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रतिनिधी श्रीमती प्रियंका कुलकर्णी, मुख्याधिकारी शंकर गोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव उपस्थित होते.
            कार्तिक वारीमध्ये 65 एकर, वाळवंट, जिजामाता उद्यान, तुकाराम भवन आणि पत्राशेड या पाच ठिकाणी भाविकांसाठी मदत केंद्रे तर उप विभागीय कार्यालय येथे मुख्य नियंत्रण कक्ष कार्यान्वित केली आहेत. या सर्व मदत केंद्रानी समन्वयाने काम करावे. मदत केंद्रातील प्रमुखानी आपल्या मदत केंद्राच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच तो परिसर स्वच्छ राहील याची खबरदारी घ्यावी. येणाऱ्या भाविकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठीही प्रयत्न करावेत.
            पोलीस अधीक्षक विरेश प्रभू म्हणाले, पोलीस व नगरपालिका प्रशासनाने वाळवंटामध्ये अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घ्यावी. भाविकांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या कक्षानी त्यांच्या परिसरात अफवा पसरणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी कार्यशाळेतील अधिकारी-कर्मचारी यांना दिल्या.

000000