अखेर पंढरीतील लिंक रोडवर बसले गतीरोधक.... इफेक्ट ‘पंढरपूर लाईव्ह’.... वारंवार होणार्‍या अपघातांना बसेल आळा..... नागरिकांच्या वतीने कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांचे आभार..

पंढरपूर लाईव्ह:- दि.19 नोव्हेंबर 2015

      पंढरपूर शहरातील प्रबोधनकार ठाकरे चौक (नविन कराड नाका) ते क्रांतीसिंह नाना पाटील चौक (के.बी.पी. चौक) या व्हीव्हीआयपी मार्गावर (लिंक रोड) कांही ठिखाणी गतीरोधक बसवावेत जेणेकरुन येथे होणारे सततचे अपघातास आळा बसेल. यासंदर्भात पंढरपूर लाईव्ह ने उपनगरातील नागरिकांसह दिलेल्या लढ्याला आज यश आले असून आज या मार्गावर आवश्यक तेथे दर्जेदार गतीरोधक बसविण्याचे काम सुरु झाले आहे. निश्‍चितच आता या गतीरोधकामुळे भरधाव वेगात चालणार्‍या वाहतुकीची गती येथे मंदावेल आणि होणार्‍या अपघातांना आळा बसेल.


  •  नागरिकांच्या वतीने सक्षम कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांचे आभार....
  •                 लिंकरोडचा हा प्रश्‍न मार्गी लागत असल्याबद्दल मनस्वी खुप आनंद होत आहे. मात्र  या कार्यासाठी पंढरपूर लाईव्ह च्या  कार्यास पाठबळ देणारे  ज्ञात अज्ञात हितचिंतक व विशेषत: सामाजिक कार्यकर्ते गणेश सिंघण, पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, वाहतुक पोलिस निरीक्षक श्री.गोपाळचावडीकर , सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता श्री.राऊत व श्री.गावडे व या कार्यासाठी ज्यांचे अंतिम आदेश कामी आले ते सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक श्री.विरेश प्रभु यांचेसह सर्व सक्षम कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांचे  येथील नागरिकांच्या वतीने  विशेष आभार भगवान वानखेडे व गणेश सिंघण यांनी व्यक्त केले आहेत. पंढरपूर लाईव्ह कडे नागरिकांनी आपापल्या भागातील विविध समस्या बाबत अवश्य माहिती द्यावी. पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.  असे मत पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनी  व्यक्त केले.


        गेल्या वर्षभरापासून ‘पंढरपूर लाईव्ह’ वर येथील लिंकरोडवर वारंवार होणार्‍या अपघातासंदर्भात व यावरील उपाययोजना संदर्भात वेळच्यावेळी वृत्त प्रसारित करुन पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी पाठपुरावा सुरुच ठेवला होता. तसेच  येथील सामाजिक कार्यकर्ते व खादी ग्रामोद्योग चे संचालक  गणेश सिंघण, सामाजिक कार्यकर्ते आण्णा ऐतवाडकर सर, माहिती अधिकार कार्यकर्ते यशवंत डोंबाळी सर यांचेसह उपनगरातील अनेक जबाबदार नागरिकांना सोबत घेऊन या प्रश्‍नाबाबत ची वस्तुस्थिती संबंधित अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणुन दिली होती.

        नुकत्याच पंढरपूरच्या उपनगरात पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक  श्री.नावंदे यांचे उपस्थित पोलिस मित्र संकल्पनेबाबत माहिती देणेसाठी उपनगरातील नागरिक व पोलिस सुसंवाद कार्यक्रम झाला. यावेळीही अनेक नागरिकांनी लिंक रोडच्या प्रश्‍नाबाबत  चर्चा केली. यानंतर दुसरेच दिवशी श्री. नावंदे यांचेसह वाहतुक पोलिस निरीक्षक श्री.गोपाळचावडीकर सार्व.बां.खात्याचे उपअभियंता श्री. गावडे, यांनी या मार्गाची पाहणी केली. यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश सिंघण व निर्भीड आपलं मत चे संजय वाईकर आदी उपस्थित होते.

यानंतर दि. 28 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनीही या मार्गाची पहाणी केली. यावेळी त्यांचेसोबत उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राऊतसाो, महावितरणचे श्री.घाटोळे, सा.बा.वि. चे श्री.गावडे, पोलिस निरिक्षक श्री.नावंदेसाो, वाहतुक शाखेचे श्री.गोपाळचावडीकरसाो आदी उपस्थित होते. यावेळी लिंकरोडवर आवश्यक तेथे स्पीड ब्रेकर, बसवून घेणे, रोडचे मधोमध पट्टे मारणे, रोडवरील वाहतुकीस अडथळा असलेले एमएसईबीचे पोल बाजुला घेणे, याबाबात चर्चा झाली. व तात्काळ या सर्व कामांना सुरुवातही झाली. यापूर्वी रस्त्यावर रहदारीला अडथळा ठरणारे वीजेचे पोल बाजुला घेतले, रस्त्यावरील वटलेली झाडे काढली. व आज गतीरोधकाचे काम होत आहे. लिंकरोडवरील वर्षानुवर्षे खितपत पडलेला हा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल ‘पंढरपूर लाईव्ह’ चे सर्वत्र कौतुक होत आहे.
........................................................

लिंकरोडवरील वाढत्या अपघाताबाबत... व यावरील उपाययोजनांबाबत पंढरपूर लाईव्ह ने आजतागायत प्रसिध्द केलेल्या सर्व बातम्या खालील लिंक ला क्लिक करुन अवश्य  बघा .....

पंढरपूर लाईव्ह:- पंढरपूर शहरातील लिंकरोड वर वारंवार होणारे अपघात...? उपनगरातील रहिवाशांसाठी हा खुप मोठा प्रश्‍न बनलेला असून या मार्गाचे दुहेरीकरण व्हावे, येथे डिव्हायडर व्हावेत आणि या मार्गावर गतीरोधक किंवा झेब्रा क्रॉसिंग व्हावे आदी नागरिकांच्या मागण्या आहेत. पंढरपूर लाईव्ह च्या कॅमेर्‍यासमोर कांही जबाबदार नागरिकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्ताचे व्हिडीओ चित्रण ‘पंढरपूर लाईव्ह’ ने केले आहे.
हा व्हिडीओ पहाण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा...
http://www.pandharpurlive.com/2015/04/blog-post_27.html

http://www.pandharpurlive.com/2015/04/blog-post_72.html
पंढरपूरमधील लिंकरोड वर वारंवार होणार्‍या अपघाताबाबतची लक्षवेधी मालिका ‘पंढरपूर लाईव्ह’ वर आम्ही सातत्याने प्रसिध्द करत आहोत. काल दि. 28 एप्रिल 2015 च्या रात्री पंढरपूर शहरातील डाकबंगल्या च्या प्रमुख गेट समोरच एका कंटेनरने रस्त्यावर असलेल्या एमएसईबीच्या विद्युत खांबाला जोराची धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातामुळे विद्युत खांब वाकडा-तिकडा होऊन कंटेनरवर कोसळला. विजेच्या तारा तुटल्या.

http://www.pandharpurlive.com/2015/05/blog-post_54.html
आजतागायत या चौकात तसेच क्रांतीसिंह नाना पाटील चौक (केबीपी चौक) येथे तसेच या दोन्ही चौकाला जोडणार्‍या लिंक रोडवर सातत्याने लहान मोठे अपघात घडले आहेत. यामध्ये अनेक
निष्पापांचे बळी सुध्दा गेलेले आहेत.


पंढरपूर शहरातील नविन कराड नाका (प्रबोधनकार ठाकरे चौक) ते क्रांतीसिंह नाना पाटील चौक (के.बी. पी. चौक) या प्रमुख दोन चौकांना जोडणारा लिंक रोड (व्हीआयपी मार्ग) या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून या मार्गावर अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. 




http://www.pandharpurlive.com/2015/10/blog-post_58.html

लिंकरोडवर लवरकरच बसणार गतीरोधक... ‘पंढरपूर लाईव्ह’ ने उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सोबतीने दिलेल्या लढ्याला अखेर यश...