पंढरपूर मधील म.फुले चौकातील भुयारी गटारीवरील चेंबुरच्या जाळीत अडकला खडीने भरलेला टीपर... कित्येक दिवसापासून सदर जाळी तुटलेल्या अवस्थेत.. न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 31 नोव्हेंबर 2015
     पंढरपूर शहरातील महात्मा फुले चौक येथे विवेक वर्धिनी शाळेसमोर असणारे नगरपालिका भुयारी गटारीवरील चेंबरच्या जाळीत आज रात्री 7:30 वा. एक खडीने भरलेले टिपर फसले. टिपरचे संपुर्ण चाकच आत गेले होते.
         या गटारीच्या चेंबरवरील जाळी ही गेल्या कित्येक दिवसापासून तुटलेल्या स्थितीत होती. ह्यापूर्वीही याठिकाणी वाहने अडण्याच्या घटना घडल्या होत्या. या जाळीचे दुरूस्ती बाबत नगरपालिकेकडे स्थानिक नागरिकांनी निवेदन ही दिले होते. मात्र न.प. प्रशासनाने याकडे कानाडोळा केला. यामुळेच आजची दुर्घटना घडली. याच चौकात रिक्षा स्टाॅप आहे, शाळा आहे तसेच हा रस्ता रहदारीचा आहे त्यामुळे याबाबत न.प. प्रशासनाने याची त्वरीत दखल घेणे आवश्यक होते मात्र तसे घडले नाही. आत्ता तरी न.प. प्रशासनाने ही जाळी व अशा इतर ठिकाणच्या जाळया तपासून वेळीच खबरदारी व आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.

या घटनेनंतर सदर ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. ही घटना समजताच  शहर वाहतुक शाखेचे निरीक्षक निलेश गोपाळचावडीकर यांनी घटनास्थळी धाव घेत खोळंबलेली वाहतुक सुरळीत केली. टीपरचे मागील चाक जाळीत फसलेले असून सुदैवानं कोणतेही गंभीर घटना घडली नाही. टिपर काढणेचे काम चालु आहे.