विविध मागण्यांसाठी 23 ऑगस्ट रोजी पंढरीत महादेव कोळी समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन-अरुण (भाऊ) कोळी
पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-
गेल्या कित्येक वर्षापासून महादेव कोळी समाज करत असलेल्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासंदर्भात व याबाबतच्या जन-आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवार दि. 23 ऑगस्ट 2015 रोजी पंढरपूरमध्ये महादेव कोळी समाजाच्या भव्य रॅलीसह कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी व समाजबांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोळी महासंघाचे प.महाराष्ट्र अध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांनी आज येथील रेस्ट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘‘शासन दरबारी प्रलंबीत विविध मागण्यांसंदर्भात कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकार्यांचा विचार विनिमय होणेसाठी आयोजित या मार्गदर्शन मेळाव्यासाठी कोळी महासंघाचे राज्य अध्यक्ष रमेशदादा पाटील, युवा नेते अॅड. चेतन पाटील व राज्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. त्या अनुषंगाने सकाळी 10 वा. कोळी महासंघाच्या वतीने व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने भव्य रॅलीद्वारे क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथुन कार्यक्रम स्थळापर्यंत समाजबांधव व पदाधिकारी जाणार आहोत. पंढरपूरमधील क.भा.पा. कॉलेज पासून ते जय भवानी चौक-नाथ चौक-तांबडा मारुती-कालिका देवी चौक-काळा मारुती ते शिवाजी चौक-स्टेशन रोड, आंबेडकर चौक - ब्लड बँक-सांगोला चौक-अभिजीत मंगल कार्यालय पर्यंत हा रॅलीचा प्रवास असून ही रॅली कोळी महासंघाच्या वतीने शांततामय व सनदशिर मार्गाने मेळावा स्थळापर्यंत जाईल.’’
या मेळाव्याचा उद्देश हा समाजातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी असून कोळी महासंघाच्या वतीने यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महिलांसाठी लघु उद्योग उभा करुन स्वावलंबी बनविण्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न व्हावा अशी मागणी राज्य अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्याकडे करणार आहोत. समाजातील तरुणांचाही बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. याचाही विचार कोळी महासंघाच्या राज्याच्या नेत्यांनी करणे गरजेचे असल्याने ही मागणीही प.महाराष्ट्राच्या वतीने आपण करणार आहोत. अशी माहिती यावेळी अरुणभाऊ कोळी यांनी दिली.
या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रासह संपुर्ण महाराष्ट्रातील तमाम कोळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या प्रलंबीत मागण्या शासन दरबारी मांडून त्या मार्गी लावण्यासाठी आपल्या समाजाचा आवाज या मेळाव्याद्वारे बुलंद करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. या मेळाव्यास प्रमुख निमंत्रीत म्हणून महिला राज्य अध्यक्ष सुमनताई कोळी, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, माजी नगरसेवक संतोष नेहतराव, माजी नगरसेवक गणेश अधटराव, सरपंच लक्ष्मण धनवडे, महिला जिल्हाध्यक्ष अॅड. रामेश्वरी माने, राज्य कार्याध्यक्ष डॉ.गजेंद्र भांजी, उपाध्यक्ष प्रकाश बोबडी, राज्य उपाध्यक्ष रामकृष्ण केणी, ठाणे जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर शरद कोळी, अरुणभाऊ लोणारी (कोळी), अक्कलकोट व कोळी समाजातील असंख्य महिला व समाजबांधव उपस्थित रहाणार आहेत. अशी माहितीही यावेळी कोळी संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांनी दिली. अधिक माहिती साठी संपर्क -अरुणभाऊ कोळी (मोबा.9404301777)
