संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

पंढरपूर दि. 21 - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन आज सोलापूर  जिल्ह्यातील धर्मपूरी येथे झाले.  याप्रसंगी  जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री विजय देशमुख , जि.प.अध्यक्षा

श्रीमती जयमाला गायकवाड, आ.हनुमंत डोळस, आ.रामहरी रुपनवर,  जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करुन स्वागत केले.

तसेच याप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, सभापती रुपाताई बेंदगुडे, शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धवलसिंह मोहीते पाटील, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे आदी  विविध अधिकारी, पदाधिकारी, प्रतिष्ठति नागरिक, भाविकांनी जिल्ह्यात पालखीचे उत्साहाने स्वागत करण्यात आले.सकाळी 10.45 वाजता माऊलीच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन.    यावेळी पालकमंत्री विजय देशमुख  यांच्या हस्ते माऊलीच्या अश्वाचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी  पर्यावरणाची वारी - पंढरपूरच्या दारी ’ या संकल्पनेतून जेष्ठ स्त्री भारुडकार चंदाताई तिवाडी यांच्या कला पथकाकडून प्रबोधनपर कार्यक्रम सादर तसेच संत गाडगेबाबाच्या वेशभुषेव्दारे खंडोजी गायकवाड 
                           सदरील पालखी सोहळ्यात पालकमंत्री विजय देशमुख,  जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधिक्षक वीरेश प्रभु यांसह  विविध अधिकारी धर्मपुरी ते डाक बंगला मैदान पर्यंत पायी, टाळ वाजवत तर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी काही काळ पालखी खांद्यावर घेवून वारक-यांमध्ये सहभागी झाले होते.


यांच्याकडून स्वच्छतापर जनजागृती कार्यक्रम सादर केले .

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com

    

********

____________________________________