पंढरपूर बँकेच्या चेअरमन पदी प्रशांत परिचारक यांची तर व्हाईस चेअरमनपदी श्री.दीपक शेटे यांची बिनविरोध निवड..... बँकेच्या सल्लागारांमध्ये प्रा.नागेश सिंघण (सर) यांचा समावेश

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

पंढरपूर 21 :

शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर या राज्यस्तरीय बँकेची पंचवार्षिक निवडणुक सन 2015-16 ते 2020-21 या कालावधीसाठी निवडुन आलेल्या नुतन संचालक मंडळामधून चेअरमनपदी श्री.प्रशांतराव परिचारक यांची फेरनिवड होवून व्हाईस चेअरमनपदी श्री.दीपक रामेश्‍वर शेटे यांची बिनविरोध निवड झाली.  तसेच अर्बन बँकेवर विविध भागातून कांही सल्लागारांची निवड झालेली आहे. यामध्ये पंढरपूरमधील उपनगरातील नागालँड परिसरातील  प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व व खादी ग्रामोद्योग चे अध्यक्ष प्रा.नागेश सिंघण (सर) यांचा समावेश आहे.

पंढरपूर बँकेच्या प्रशासकीय भवन, पंढरपूर येथे अध्यासी अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी श्री.पी.टी.घुगे यांचे अध्यक्षतेखाली सदरची निवडणुक प्रक्रिया पार पडली. यावेळी श्री.घुगे यांनी संचालकांनी रिझर्व्ह बँक व सहकार खात्याचे मार्गदर्शनात्मक तत्वांचा पालन केल्यास संस्थेची प्रगती कशी होते याबाबत सविस्तर माहिती सांगितली.
या प्रसंगी बँकेचे कुटुंबप्रमुख मा.श्री.सुधाकरपंत परिचारक व ह.भ.प.वा.ना.उत्पात यांचे हस्ते बँकेचे नुतन

संचालक मंडळ, माजी संचालक मंडळ, तसेच नुतन शाखानिहाय स्थानिक सल्लागार समितीमधील सदस्यांचा सत्कार कर्मयोगी सभागृहात आयोजित करणेत आला होता.
सत्कार प्रसंगी बोलताना चेअरमन श्री.प्रशांत परिचारक म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व सुमारे 1500 कोटीहून अधिक व्यवसाय असलेली आपली पंढरपूर बँक एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सर्वोत्तम सेवासुविधा ग्राहकांना मिळाव्यात याबाबत सातत्याने प्रयत्नशील आहेे. बँकेचे 40000 हून अधिक सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकांनी दाखविलेला विश्‍वासास पात्र राहून बँकेचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. काळानुरूप बँकेचे कार्यक्षेत्रामध्ये वाढ होत शाखाविस्तार होत आहे, महाराष्ट्रामध्ये पंढरपूर बँकेची नवी ओळख निर्माण होत आहे. शाखांमधील कामकाज त्वरीत होण्यासाठी शाखापातळीवर स्थानिक सल्लागार सदस्यांची नेमणूक करणे आवश्यक असल्याने पुर्वीपासून शाखेची वाढ होणेसाठी कोणतीही अभिलाषा न बाळगता ज्यांनी हातभार लावत आले आहेत अशा सदस्यांची नेमणूक केली. नुतन संचालकांना ग्राहक व बँक यामधील दुवा याप्रमाणे काम करावे असेही आवाहन केले. बँकेला पर्यायाने सहकाराला भविष्यात यशस्वी वाटचाल करणेसाठी टीमवर्कने कामकाज करावे लागणार आहे.

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com

    

********

____________________________________