आषाढी एकादशीच्या मंगल पहाटे चे विठोबा रखुमाईचे साजिरे रुप बघा... पंढरपूर लाईव्हवर... राज्यावरचे अवर्षणाचे संकट दूर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे पांडुरंगाला साकडे...
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- पंढरपूर दिनांक 27-
राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, राज्यातला शेतकरी सुखी होऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् व्हावे असे साकडे पांडुरंग चरणी घातले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंढरपूर येथे आज आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापुजेनंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अमृता फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. खडसे, मानाचे वारकरी राघोजी नारायणराव धांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनिता राघोजी धांडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षेत्रीय, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. क्षेत्रीय, मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकरी सुखी झाला तर राज्य सुखी होईल. आज या शासकीय महापुजेचा मान मिळाला हा माझ्या जीवनातील भाग्याचा दिवस आहे. यामधून मिळालेली शक्ती, उर्जा याचा वापर राज्यातील सामान्य माणसाच्या कल्याणासाठी करु असे प्रतिपादन केले. तसेच पंढरपूरच्या विकासासाठी कालबद्द कार्यक्रम आखण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
यावेळी श्री. राघोजी नारायणराव धांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सांगिता राघोजी धांडे यांना मुख्यमंत्र्यांच्या समवेत शासकीय महापुजेचा मान मिळाला. पिंपरी खुर्द ता. कळमनुरी जि.हिंगोली येथील असून ते गेली 16 वर्षे पायी वारी करीत आहेत. तसेच त्यांनी परदेश दौराही केलेला आहे.





