पंढरपूर येथील चेंगराचेंगरींच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वैद्यकीय अधीक्षकांचे आवाहन

पंढरपूर लाईव्ह वृत्त पंढरपूर दि. 27 : 

आषाढी यात्रा 2015 मध्ये चेंगराचेंगरी झाल्याची अफवा पसरविण्यात आली असून अशा अफवांवर जनतेने व भाविकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पंढरपूर उप-जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोरुलकर यांनी केले आहे.

यात्रेत आज 27 जुलै रोजी विविध ठिकाणी झालेल्या ढकलाढकलीत 22 व्यक्ती जखमी झाल्या. यातील 7 रुग्ण सोलापूर सिव्हील हॉस्पिटलकडे पाठविण्यात आले असून दोन रुग्णांवर उप-जिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे उपचार चालू आहेत. तर          13 रुग्णांना औषोधोपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात्रेत चेंगराचेंगरी होऊन मृत्यू झाल्याची घटना आढळून आली नसून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असेही वैद्यकीय अधीक्षक यांनी कळविले आहे.