पंढरपूर शहर पोलिस ठाण्या चे वतीने आषाढी वारी 2015 मध्ये बंदोबस्तास तैनात असलेल्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान.... सोलापूर ग्रामीण पोलिस चे पोलिस अधिक्षक फिनोलेक्स् इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे यांचे वतीने डॉ. एस. वीरेश प्रभु व कंपनीचे डेप्युटी मॅनेजर श्री.संजय आळीकट्टे यांचे हस्ते सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मा चिन्ह..!

पंढरपूर लाईव्ह वृत्

महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी पंढरीत भरणार्‍या आषाढी यात्रेच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी मोठ्या संख्येने तैनात असतात. अशा सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान व सत्कार पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या वतीने सोलापूर ग्रामीण पोलिस चे पोलिस अधिक्षक डॉ. एस. वीरेश प्रभु यांचे हस्ते करण्यात आले.

फिनोलेक्स् इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे यांचे वतीने  कंपनीचे डेप्युटी मॅनेजर श्री.संजय आळीकट्टे यांचे हस्ते   सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मा चिन्ह देण्यात आले.  या कार्यक्रमास सोलापूर ग्रामीण पोलिस च्या अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले, पोलिस उपअधिक्षक अमृतकरसाो व पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिक्षक श्री.किशोर नावंदेसाो पंढरपूर शहर वाहतुक शाखेचे एपीआय श्री. गोपाळचावडीकर, गोपाळ अदोणे व श्रीराम बडवे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी फिनोलेक्स् कंपनीमार्फत आषाढी वारी कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता व भाविकांमध्ये जनजागृती होणेसाठी तमाम जनतेस विनम्र आवाहन, संदेशपर माहिती तसेच दिशादर्शक फलक पंढरपूर शहरामध्ये व शहराबाहेर लावण्यात आले आहेत.

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com