अरुणभाऊ कोळी मित्रमंडळ व जयभवानी सांस्कृतीक,कला व क्रिडा मंडळाच्या वतीने पंढरीत रंगला दिमाखदार महोत्सव...... स्व.शाहीर दादा कोंडके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंढरीत लावणी महोत्सव साजरा ....
पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-

‘तळागाळातील
सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा... रसिक प्रेक्षकांच्या दिलावर राज
करणारा.... अभिनयाचा अनभिज्ञ सम्राट शाहिर (कै.) दादा कोंडके यांच्या
स्मृतीला उजाळा देणारा दिमाखदार महोत्सव नुकताच पंढरीच्या अरुणभाऊ कोळी
मित्रमंडळ व जयभवानी सांस्कृतीक,कला व क्रिडा मंडळाच्या वतीने साजरा
करण्यात आला. यावेळी अनेक सदाबहार लावण्यांचे सादरीकरण करण्यात आले. रसिक
प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात, शिट्ट्यांच्या निनादात विविध
कलावंतांनी सादर केलेल्या अभिनयाला मनमुराद दाद दिली. नेहमीच वेगवेगळ्या
सामाजिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवाणी पंढरपूरकरांना देणार्या
अरुणभाऊ कोळी मित्रमंडळाचे मार्गदर्शक श्री.अरुणभाऊ कोळी यांच्या
संकल्पनेतून साकार झालेल्या या महोत्सवाची चर्चा पंढरीत सर्वत्र होत असू
त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
आपल्या अष्टपैलु
अभिनयाने सिने व नाट्य रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य करीत असलेले शाहीर
स्व.दादा कोंडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ अरुणभाऊ कोळी मित्रमंडळ व
जयभवानी सांस्कृतीक,कला व क्रिडा मंडळाच्या वतीने येथील रखुमाई सभागृहात
लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाचे उदघाटन आ.भारत
भालके यांच्या हस्ते व प्रसिध्द सिनेअभिनेत्री रेश्मा जामखेडकर, अरुणभाऊ
कोळी,दिनकर पाटील, संतोष नेहतराव (मा.व्हा.चेअरमन वुलन अॅडव्हायझर कमिटी
नवी दिल्ली), दिलीप देवकुळे (प्रदेशाध्यक्ष दलित स्वयंसेवक संघ), किरणराज
घाडगे (माजी नगरसेवक), मुरलेंद्र शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात
आले.
अभिनय,गायन,पटकथा लेखक,गितकार अशा बहुआयामी
व्यक्तीमत्वाने स्व.दादा कोंडके यांनी 40 वर्षे मराठी मनावर अधिराज्य
गाजवले आपल्या कलाकृतीने अजरामर ठरले.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंढरीत
गेल्या 15 वर्षापासुन मंडळाच्या वतीने लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात
येतेे.यावर्षीच्या लावणी महोत्सवात तुमच्यासाठी काय पण,लावण्याची
धमाल-दादाची कमाल(ज्य.दादा कोंडके),मी कैरी पाडाची,ज्योती-स्वाती
पुरंदरावडेकर या महाराष्ट्रातील प्रख्यात ग्रुपच्या कलावंतानी हजेरी लावली
होती.या लावणी महोत्सवास रसिकांनी भरभरुन दाद दिल्याचे दिसुन आले.
या लावणी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती
विजयकुमार देशमुख, चळे वि.कार्य.सोसायटीचे मा.चेअरमन भास्कर मोरे,
महाराष्ट्र नाट्य परिषदेचे संचालक दिलीप कोरके,चंद्रकांत कुंभार, सरताळे
गुरुजी यांच्यासह नागेश नेहतराव, अजय कडलासकर, राजु पुरंदरे, निलेश अधटराव,
सत्यवान माने यांच्यासह अरुणभाऊ कोळी मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित होते. यापुढेही अशाच मनोरंजनाची लयलुट असलेल्या
कार्यक्रमाची प्रतीक्षा रसिकप्रेक्षक करत आहेत.
***********


*********************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!
पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!
अॅन्ड्रॉईड अॅप 11हजार 004 मोबाईलमध्ये पोहोचले!
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब
पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण
जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. रोजी आज दि. 28-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 4 हजार 962 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज
पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या
‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!
संबंध
महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्यातील मराठी माणसांनी
आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप घेतले आहे. आज
हे अॅप घेणार्या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून
दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे.
आज दि. 28-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप घेणार्या मोबाईल धारकांची संख्या 11 हजार 004 झालेली आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.
आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्रमांक 8308838111 / 8552823399
