पंढरपूर शहरात रात्री एका युवकाचा खुन.. रात्री 11.45 नंतर घडली घटना....

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-
आज दि. 28 मे 2015 रोजी रात्री सुमारे 11.45 वा. नंतर पंढरपूरमध्ये एका युवकाचा खुन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर लाईव्हला  आज रात्री 11.45 वा. माहिती मिळाली की, पंढरपूर शहरात नाथ चौक येथे एका युवकाची हत्या झालेली आहे. त्यादृष्टीने पाठपुरावा करत असताना पंढरपूर लाईव्ह ने या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पंढरपूर शहर पोलिस ठाण्याकडून माहिती मिळाली की, एकजण अत्यवस्थ अवस्थेत येथील जनकल्याण हॉस्पिटल येथे अ‍ॅडमीट असून याबाबतचा अधिक तपास चालु आहे. यानंतर जनकल्याणमध्ये या घटनेनेबाबत तपास करणारे  शहर पोलिस ठाण्याचे श्री.थोरात यांना पंढरपूर लाईव्ह च्या वतीने मोबाईलवर संपर्क केला  असता अशी माहिती मिळाली की या दुर्घटनेतील युवक निलेश चंद्रकांत  माने (वय अंदाजे 25) याला मारहाण झालेली असून याला कांही अज्ञात लोक या हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ अवस्थेत सोडून गेले. यानंतर हॉस्पिटलकडून शहर पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती मिळाली. या घटनेतील गंभीर जखमी असलेल्या  युवकाच्या  शरिरावर कोणत्याही हत्याराचे व्रण आढळलेले नाहित.  मात्र हा  युवक या घटनेत मयत झालेला असून तो पंढरपूर शहरातील भादुले चौक, गवंडे गल्ली येथील रहिवाशी आहे. मात्र ही घटना नेमकी कुठे घडली आणि का? याबाबतची माहिती अद्याप शहर पोलिसंाना मिळालेली नाही. याचा तपास चालु असल्याचे संकेत शहर पोलिसांकडून मिळाले असून लवकरच याचा छडा लावला जाईल अशी ग्वाही श्री.थोरात यांनी पंढरपूर लाईव्ह कडे दिली आहे.