जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांचेकडून मिळालेल्या आजच्या कांही महत्वाच्या घडामोडी
एक जुन पर्यंत यादी सादर करा - निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख
सोलापूर दि. 29 : ग्रामीण नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतील अनाधिकृत प्रार्थनास्थळाबाबतची अद्यावत व अचुक माहिती संबंधितांनी एक जुन पर्यंत सादर करावी ती सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिला.
अवैध प्रार्थना स्थळाबाबतचा आढावा घेण्यासंदर्भात बहुउद्देशीय सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. श्री. देशमुख पुढे म्हणाले की, 1960 पूर्वीच्या धार्मिकस्थळांबाबतची एक वेगळी यादी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच संबंधितांनी अ,ब व क वर्गात येणारी धार्मिक स्थळे अचुक निश्चित करावीत तसेच त्या ठिकाणचे सीटीएस नंबर द्यावेत. त्याचबरोबर संबंधित अवैध बांधकाम ग्रीन झोन मध्ये येते ते पहावे ? आवश्यक त्याठिकाणी पोलीस विभागाचे सहाय्य घेण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
या आढावा बैठकीसाठी मनपा आयुक्त विजयकुमार काळम- पाटील, पोलीस उपायुक्त निलेश अष्टेकर, नुतन अप्पर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनिषा दुबले, प्रांताधिकारी शहाजी पवार, मनिषा कुंभार, श्रावण क्षीरसागर यांच्यासह नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
*************************************
राज्यमंत्री गृह (ग्रामीण) ना. प्रा. राम शिंदे यांचा सोलापूर दौरा
सोलापूर दि. 29 : राज्यमंत्री गृह (ग्रामीण), पणन, सार्वजनिक आरोग्य व पर्यटन ना. प्रा. राम शिंदे हे सोलापूर दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे सोमवार दिनांक 1 जून 2015 सायंकाळी 4.30 वाजता अहमदनगर येथून शासकीय मोटारीने पंढरपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता शासकीय
मोटारीने शिवाजी चौक, पंढरपूरकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता शिवाजी चौक, पंढरपूर येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता शासकीय मोटारीने पंढरपूर येथून पुणेकडे प्रयाण.
******************







