आईनेच घेतला पोटच्या लेकीचा जीव.... अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याचा संशयातून 14 वर्षीय निष्पाप मुलीचा जन्मदात्या आईनेच केला घात.....पंढरपूर तालुक्याच्या करकंब गावातील हृदयद्रावक घटना

पंढरपूर लाईव्ह (करकंब, प्रतिनिधी):-

याबाबत पंढरपूर लाईव्हच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, करकंब येथील एका महिलेने अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याच्या संशयातून स्वत:च्याच पोटच्या लेकीला जीवे मारले... तिचा मृतदेह ऊसाच्या फडात फेकला... करकंब पोलिस ठाण्यात आपल्या मुलीचे अपहरण झाल्याचा खोटा गुन्हा दाखल केला... मात्र आज दि. 29 मे रोजी सत्य घटना उजेडात आली... खुनास वाचा फुटली.... सदर महिलेचा कांगावा पोलिसांना समजला... आईसह या गुन्ह्यात सहभागी असणार्‍या कांहीजणांना करकंब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, करकंब येथील श्रीमती सविता गोरख राऊत या महिलेच्या पतीचे 3 वर्षापूर्वी अकस्मात निधन झालेले आहे. या महिलेचे गावातीलच एका व्यक्तीशी अनैतिक संबंध आहेत. मात्र या अनैतिक संबंधाबाबत या महिलेची मुलगी मोनाली गोरख राऊत हिला कुणकुण लागली. आपली मुलगी आपल्या अनैतीक संबंधात अडसर आल्याचा संशय येवून सविता गोरख राऊत (वय38), रा.करकंब, ता.पंढरपूर या महिलेने तिचे वडील मोहन कुंडलीक घाडगे (वय 62), रा. तुळशी, ता.माढा याच्या मदतीने स्वत:ची मुलगी मोनाली गोरख राऊत (वय 14), रा.करकंब, ता.पंढरपूर हिचा खुन दि. 26 मे 2015 रोजी केला आणि तिचा मृतदेह शेतातील ऊसाच्या फडात टाकला.  व याच दिवशी आपली मुलगी बेपत्ता झाली असून तिचे अपहरण झालेले आहे अशी खोटी फिर्याद करकंब पोलिस ठाण्यात दिली. 

 मात्र काल रात्री दि. 28 मे रोजी रात्री 9:30 वाजणेच्या सुमारास गावातीलच एका इसमास शेतातून दुर्गधी येत असल्याचे जाणवले. सदर प्रकार पहताच त्याने करकंब पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. आज सकाळी म्हणजे दि. 29 मे 2015 रोजी पंढरपूर चे डी.वाय.एस.पी श्री.जाधव करकंबला दाखल झाले. याबाबतची तपासचक्रे वेगाने फिरवण्यात आली. आणि खुनाला वाचा फुटली....! मयत मुलीच्या आईच्या मोबाईलचे रेकॉर्डवरुन पोलिसांना या गुन्हयाचा छडा लावता आला. सकाळी 10 वाजता मृतदेहाचे पोष्टमार्टेम करुन तिच्यावर करकंब मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सविता राऊत आणि मोहन घाडगे तसेच इतर कांहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून तपासणी चालु आहे. तसेच याबाबत गुन्हा नोंदविण्याचे कामकाज करकंब पोलिस ठाण्यात चालु आहे. संबंधीत गुन्ह्याचा छडा लावणेकामी करकंब पोलिस ठाण्याचे ए.पी.आय. अनिल माने यांनी पंढरपूरचे डी.वाय.एस.पी. श्री.जाधवसाो यांचे मदतीने तपासचक्रे वेगात फिरवुन आरोपींच्या मुसक्या तात्काळ आवळल्याने करकंब ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

एका आईने आपल्याच हाताने आपल्या मुलीचा जीव घेणे.... एका आजोबाने आपल्याच नातीचा जीव घेणेकामी मदत करणे हा गुन्हा गंभीर आहे.... ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून विकृत मनोवृत्तीचे या दर्शनाने मन विषण्ण करणारी अशी आहे. 14 वर्षीय मोनालीच्या या दुर्दैवी अंतामुळे करकंब ग्रामस्थांमधून सर्व हळहळ व्यक्त होत आहे.  या गुन्ह्यातील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हायला हवे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

*****




*********************


 

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!


पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  11हजार 423 मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

  आज दि.  रोजी आज दि. 29-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 8 हजार 413 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  29-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   11 हजार 423 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399