भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या
संकल्पनेतून जनहितार्थ झालेल्या ‘‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’’ व
‘‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा’’ पंढरपूर अर्बन बँकेच्या
खातेदारांना लाभ घेता येणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक
यांनी दिली. या संदर्भात पंढरपूर अर्बन बँक व दि.न्यु इंडिया अॅश्युरन्स
यांच्या सामंजस्य करार झाला असून बँकेच्या खातेदारांच्या हितासाठी ही योजना
कार्यान्वित केली असल्याची यावेळी ते म्हणाले.
सदर विमा योजनेची
सविस्तर माहिती सांगताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण डिंगरे
म्हणाले की, ग्राहकांना दर्जेदार सेवा देणेस अग्रगण्य असणारी आपली
दि.पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर व दि.न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी
यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. बँकेच्या कोणत्याही शाखेच्या खातेधारकास
या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याचा
कालावधी दि.1 जून ते 31 मे पयरत असून ही योजना 18 ते 50 वयोगटातील बचत
खातेदारांसाठी आहे. याचा वार्षिक हप्ता रू.330/- असून कोणत्याही कारणास्तव
मृत्यु आल्यास वारसाला रू.2 लाखाचे विमा संरक्षण मिळणार आहे. प्रधानमंत्री
सुरक्षा विमा योजना याचा कालावधी दि.1 जून ते 31 मे पयरत ही योजना 18 ते 70
वयोगटातील बचत खातेदारांसाठी आहे. याचा वार्षिक हप्ता रू.12/- असून अपघाती
अथवा कायमचे अपंगत्व आल्यास विमा संरक्षण खातेदारास मिळणार आहे. मात्र
कोणत्याही एका बँकेतील एकाच खात्यास या योजनेचा लाभ घेता येईल.
तरी जास्तीत जास्त खातेदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण डिंगरे,
जनरल मॅनेजर उमेश विरधे सर्व संचालक मंडळांनी केली आहे.
*******


*********************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!
पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!
अॅन्ड्रॉईड अॅप 11हजार 004 मोबाईलमध्ये पोहोचले!
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब
पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण
जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. रोजी आज दि. 28-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 4 हजार 962 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज
पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या
‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!
संबंध
महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्यातील मराठी माणसांनी
आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप घेतले आहे. आज
हे अॅप घेणार्या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून
दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे.
आज दि. 28-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप घेणार्या मोबाईल धारकांची संख्या 11 हजार 004 झालेली आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.
आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्रमांक 8308838111 / 8552823399
